बचना ऐ हसिनों

बचना ऐ हसिनों काल या नावाचा सिनेमा पाहीला आणि आश्चर्यच वाटल. तो हीरो किती सहजपणे दोघी मुलींना फसवतो आणि जोपर्यंत स्वतः प्रेमात पडत नाही (खऱ्याखुऱ्या) तोपर्यंत त्याला जाणीवच होत नाही कि त्याने एवढा मोठा गुन्हा केला आहे ते! मला वाटतं प्रत्येक माणसाला सारासार विचार करण्याची बुद्धी असते. त्याला एवढही कळत नाही कि आपण या मुलीला फसवतो आहे ते? आणि नंतर साळसूदपणे माफी मागायला जातो? लाज नाही वाटत?

तो सिनेमा असल्याने सगळं ok होत ही. अर्थात बिपाशा बासू त्याला चांगला धडा शिकवते. पण वास्तवात जेव्हा लग्नाच्या ऐनवेळी नवरा मुलगा पळून जात असेल तेव्हा त्या मुलीच काय होत असेल?? कदाचित तिलाच मूर्ख म्हणून हिणवल असेल समाजानी! चांगला मुलगा दिसला कि या पोरी पाघळतात! अस काहीस ऐकावही लागल असेल बिचारीला.

नक्कीच! चांगला दिसला म्हणूनच पोरी पाघळतात न! पण नारळासारख फोडून तर पाहता येत नाही न कि वरुन चांगला दिसला तरी आतून सडका आहे ते!

वास्तवात एखाद्या मुलीने अशा प्रसंगी आत्महत्या ही केली असेल असा विश्वासघात झाल्यावर.
मग काय आता स्वर्गात जाणार माफी मागायला? आणि कोणत्या तोंडाने तिची माफी मागणार? आणि माफी मागितली की झाल?? सुटलात??

मला वाटतं शरीरा पेक्षाही मनावर झालेले घाव अधिक खोलवर असतात. एखादी मुलगी पक्की असेल तर उभी पण राहील, नसेल तर?
विश्वासघात हा विश्वासघातच असतो. त्यात कमी -जास्त अस काही नसत. it’s a crime !! आणि गुन्हेगाराला शिक्षा ही व्हायलाच हवी. कशी? don’t know !! दुर्दैवाने!!

माझ्या एका मैत्रीणिला तिच्या नवऱ्याने कॉलेज मधे “I love you” म्हटल्यावर ती लगेच म्हणाली कि then you have to marry me!! तो म्हणाला yes off course! पण आज तो कबूल करतो कि त्याला तिची ही प्रतिक्रिया अपेक्षित नव्हती. पण ती पक्की होती. प्रेम केल तर लग्न हे करावच लागणार. हा मेसेज त्याच्या पर्यंत गेला होता.
त्यासाठी आपल्या मुलींना मात्र खंबीर करण आणि समोरची व्यक्ती ही केव्हाही धोका देऊ शकते यासाठी तिच्या मनाची तयारी करण आणि योग्य ती लक्ष्मणरेषा पाळण्याची तिला शिकवण देण हा एकच उपाय मला दिसतो आहे……

- Varsha Hemant Phatak





« Prev Next »