बोनस

बोनस

हो आज मी इथे अगदी एकटी आहे कारण मी स्वतःच स्वतःच्या पायावर sorry जीवावर धोंडा मारुन घेतला आहे.

मी अतिशय अहंकारी बाई होते. सतत नवऱ्यावर संशय घ्यायचे. रोज भांडण ठरलेल होत.चूक माझीच असायची पण राग मला अनावर व्हायचा आणि कबूल करायला लाज वाटायची. माझा मुलगा तर फक्त 6 वर्षाचा आहे आणि मुलगी 10 वर्षाची. कस होणार तिच. वयात येईल या वर्षी. कोण समजावणार तिला? माझ्याशिवाय कस होईल तिच? मुलगा तर अजिबात मला सोडून राहात नाही. एवढ सगळ भरल घर सोडून मी इथे आले. मला खूपच एकट वाटत आहे. रागाच्या भरात मी झोपेच्या गोळ्या खाल्ल्या आणि आता मला माझी चूक कळली आहे. माझा नवरा माझ्याशी खोटे बोलत नव्हता. तो खरच सांगत होता पण तेव्हा डोक्यात राख घालून घेतली. पोलिस आता माझ्या नवऱ्याच्या मागे लागले आहेत संशयित म्हणून. माझी मूल रडतात आहे. बाबांनी पण माझ्या नवऱ्याला अपराधी ठरवल आहे. नाही हो तो अपराधी नाही. सोडा त्याला सोडा!!

देवा वाचव रे! वाचव त्यांना! मी जीवाच्या आकांताने ओरडले.

कशाला वाचवू? आवाज आला.

अरे ! कोण बोलले?

मुर्ख बाई! मी देव! तुच मला हाक मारलीस न!

देवा तू!! आलास?

मी नाही तू इथे वरती आली आहेस. देव उवाच.

देवा मला please वाचव.

हे थांबव रे सगळ. नाहीतर माझी मुले अनाथ होतील. मी इथे वरती आणि नवरा जेलमध्ये. कस होईल त्यांच??
हा विचार झोपेच्या गोळ्या खायच्या आधी करायचा न! शहानिशा न करता नवऱ्यावर आरोप ठेवले आणि लगेच मरायला निघालीस? तुझ्या जवळ सगळ होत. सुख दुखत होत तुझ. देव म्हणाला. अरे आमच्या हिंदी सिनेमात म्हणतात कि एक बार तो भगवान भी माफ करता हैं। कर न मला माफ. मी परत अस कधीच नाही करणार. तुझी शप्पथ देवा!!

तू आता अस करुच नाही शकणार कारण तू आता मेलेली आहेस अस म्हणून देव राक्षसा सारखा हसायला लागला आणि त्याच्या दुप्पट आवाजात मी रडायला लागले. डॉक्टर लवकर या. पेशंट शुद्धीवर येतो आहे. काहीतरी बोलायचा प्रयत्न करतोय. सगळी धावाधाव सुरू होती. वरतून देव माझ्याकडे पाहून हसत होता. मी मनोमन त्या विधात्याला नमस्कार केला.

- Varsha Hemant Phatak





« Prev Next »