नीता माने नीं आल्या आल्या बराकीत एक चक्कर टाकली. खरतर तालुक्याच गाव होत हे . त्यामुळे खूप काही मोठा पसारा नव्हता पण तरी कर्तव्यदक्षता निभवायची हा स्वभावच होता तिचा.जेलर म्हणून तिच हे पहिलच पोस्टिंग होत.
तितक्यात बाहेर काहीतरी गडबड ऐकू आली. झगडू बाबा पडला परत.
झगडू, झगड्या हे शब्द तिच्या कानावर आदळायला लागले. ती धावत बाहेर गेली. तसा हवालदार म्हणाला ,”मँडम त्याच रोजच आहे हे.केव्हाही चक्कर येऊन पडतो.खुनाची केस आहे ती.आम्ही बघतो.
तरी पण ती गेलीच. सगळे बाजूला झाले. तोच होता तो.तिच्या तोंडून नकळत निघाल, “झगडू काका”.
कोणी हाक मारली?झगडू ने हळूच डोळे उघडले.
मी नीतुडी बातुडी!!
पोरी तू!
जणु काही जान आली त्या शरीरात. सगळे जण आश्चर्यचकित होऊन बघत होते.
काका चल आत चल.मला तुझ्याशी खूप बोलायच आहे.
नीता ने झगडू काका ला पाणी दिलं.
पोरी, साहेब कसे आहेत?
झगडू काका मी 4 वर्षांपूर्वी घर सोडलं ते.
मला माहिती आहे माझ्या आईचा खून तू नाही केला तर माझ्या वडिलांनीच तिला मारल आहे आणि आता मी हे सिद्ध करणार आहे.
तूला किती शोधल मी पण तू गायबच झाला होता आणि बाबा पण काहीच सांगत नव्हते.
तेव्हा मी 6 वर्षाची होते पण मला सगळं आठवत आहे व्यवस्थित.तू का अस केलस?का खोट बोललास?बाबांचा आळ तुझ्यावर का घेतलास?
अग पोरी तुझा बाप माझा अन्नदाता होता, मालक होता. त्याच्या वरचा आळ मी नाही घेणार तर कोण घेणार?जे झालं ते गंगेला मिळालं. मी नाही आता बाहेर येणार.जा, साहेब खूप मोठ्या मनाचे आहेत.
नीता ने मात्र पक्क ठरवलं होत कि ती झगडू काकाला निर्दोष सिद्ध करणारच आणि तिच्या वडिलांना खुनी!!
नीता दुसऱ्याच दिवशी तिच्या वडिलांना म्हणजे आप्पांना भेटायला गेली.
त्यांना बघताच तिच्या डोक्यात संतापाची तिडीक गेली.
झगडू भेटला हे सांगितल्यावर तिला वाटल आप्पा चिडतील,घाबरतील पण तस काहीच झालं नाही.
ते शांत होते.
पोरी तुझी काय इच्छा आहे?मी जेलमध्ये जाऊ का?
हो तुमच्या सारख्या हलकट माणसाची तिथे च जागा आहे.
झगडू काकांचा तुम्ही बळी दिलात.स्वतःच्या स्वार्थासाठी. नीता खूप चिडली होती.
नाही ग पोरी.त्याने माझ्यासाठी नाही तुझ्यासाठी माझा आळ स्वतःवर घेतला. कारण तू माझी नाहीस तर झगडू ची मुलगी आहे. मी नावाचा बाप आहे तुझा.
आता मात्र नीता निःशब्द झाली होती.
झगडू काका माझे वडील ??
कस शक्य आहे हे?
आप्पांनी सांगायला सुरुवात केली.
आप्पांच लग्न झाल्यावर7/8 वर्षे त्यांना मूल होत नव्हते. त्यांची बायको सतत त्यांना दोष द्यायची.नेमकं तेव्हाच झगडू ची बायको प्रेग्नंट होती. आप्पांनी मूल दत्तक घ्यायच ठरल. आणि दैवाने वेळ साधली. झगडू ला मुलगी झाली पण बायको मेली.
मी तूला दत्तक घ्यायच ठरवलं आणि घेतलं.पण माझी बायको तूझा सतत राग राग करायची कारण तिला हवा होता दत्तक मुलगा.तिने खूपदा तुला मारायचा प्रयत्न केला. पण मी आणि झगडू ने तो हाणून पाडला.
एक दिवस तिने परत तसच केल म्हणून मी तिला मारल आणि तो घाव नेमका वर्मावर बसला.ती तिथेच कोसळली. तुला वाटलं मी तिचा खून केला.
तुझ्यासाठी झगडू ने आळ त्याच्यावर घेतला. कारण त्याला तुला चांगले शिकवायचे होते.मोठ करायच होत. आणि त्यानेच शपथ घातली होती तुला काही न सांगायची.
आप्पा म्हणाले मी तुमच्या दोघांचा गुन्हेगार आहे पण खर सांगु तुझ्या वरच्या प्रेमापोटीच आम्ही दोघांनीही आपापल्या परिने वडिलांच नातं निभवायचा प्रयत्न केला.
न्याय आता तुला करायचा आहे .