अनुकरण

अनुकरण
आज पेपर वाचत होतो
अत्याचार! अत्याचार!
अचानक सगळीकडे रावण
दिसायला लागला
जीव घाबरला, मी श्रीरामाचे
नाव घेतले, जीव शांत झाला

आज बागेत फिरायला गेलो
परत तेच,
लहान मुले फुलं चूरगाळून टाकतं होती आणि टाळ्या पिटून
हसतं होती
मला नकळतपणे अत्याचारित मुलींची आठवण झाली
मी ती चुरगळलेली फुले रामाला
अर्पण केली
जीवाला शांतता लाभली.

आज मंदिरात गेलो
एका मुलीचे जबरदस्तीने
लग्न होतं होते, मी पोलिसांना लगेच फोन केला
लग्न थांबवलं
मला माझ्यातच राम दिसला
मी समाधानाने घरी आलो

शिव्या द्यायला रावण हवा असतो
तर योग्य मार्गावर चालायला
श्रीराम का नको?

वर्षा हेमंत फाटक, पुणे


- Varsha Hemant Phatak
« Prev Next » Share
Likes: 0 Views: 49