About Me
नमस्कार मी वर्षा हेमंत फाटक.
मी कॉमर्स पदवीधर आहे. मला ललित, कथा आणि कविता करायला खूप आवडतं. बऱ्याचशा ईबुकसाठी मी लिखाण केले आहे.
तसेच दिवाळी अंकात ही माझ्या कथा प्रकाशित झाल्या आहेत.
अष्टवामा या मराठी - हिंदी आठ लेखिकांनी मिळून प्रकाशित केलेल्या कथासंग्रहात माझ्या दोन कथा आहे आणि अवकाश या कथासंग्रहात माझ्या चार कथा आहेत.
मधु मंगेश कर्णिक यांच्या साहित्यावर आधारित पुस्तकात मी 'स्पर्श उत्कटाचे' या कथासंग्रहाचे परिक्षण केले आहे बंध घननिळाशी या ईबुकसाठी कृष्ण आणि गांधारी हा लेख लिहिला आहे.
आम्ही सिद्ध लेखिका आयोजित पुस्तक 'राम रंगी रंगले' यात श्रीराम आणि सुग्रीव, लंकादहन हे दोन लेख लिहीले आहे. 'समग्र समर्थ' या पुस्तकात मी श्री समर्थांची बोधवचने आणि सुविचार यावर लेख लिहिला आहे.
मी हिंदी, गणित आणि सायंस या तीन विषयांचे क्लासेस घेते.
- Varsha Hemant Phatak