आवडती

आवडती

घेता मी तिला
हळूच मिठीत।
दिसतो आईच्या
राग डोळ्यात।

करते ती मग
आमची ताटातूट।
डोळ्यात येते
पाणी अतूट।

चिडचिड मी
खूप करतो।
तिच्या कडे
दुरुनच पहातो।

ती पण मला
सतत खुणावते।
आईला तर ती
ना घाबरते।

बहाणा मी
अभ्यासाचा करतो।
हळूच तिला
जवळ बाहतो।

रंगून मग जातो
तिच्याच रंगात।
बेधुंदता येते
कणाकणात।

अशी ही झोप
माझी प्रियतमा।
प्रेमास आमच्या ना
बंधन ना सीमा।

- Varsha Hemant Phatak





« Prev Next »