आठवण
आठवणींना तुझ्या
दफन पुरते केले
भ्रमात होतो मी
लक्षात नंतर आले
हटवादी मी ही पुरता
हार ना कधी मानली
विसरण्यासाठी तूला
प्रयत्नांची पराकाष्ठा केली
अखेर ती सरशी
माझीच मग झाली
विसरलो तूला खास
ग्वाही हृदयाने दिली
हाताला येणारा सुंगध
सहजिच तो झटकला
आठवणींच्या कैदेतून
जीव आमचा सोडवला
कधीतरी मजनू डोकावतो
आमच्या भाबड्या मनात
नको आयुष्य करु बरबाद
सांगतो हळूच कानात
प्यारव्यार काही नसते
सगळ्यां बाता फुकाच्या
जी मिळेल तिच्या सोबत
संसार कर रे सुखाचा
गुरुचे बोलं ते कसे
दुर्लक्षित आम्ही करावे
आठवणीत तुझ्या
बर्बाद का मग व्हावे?
##########
ऐकूनि माझा हा सवाल
हवालदिल ती झाली
बाजी होती आम्ही जिंकली
माप ओलांडून घरी आली
आता मात्र मजनू तूला
आहे कळकळीने सांगणे
लग्नापेक्षा विरहातलेच
चांगले होते रे जगणे
वर्षा हेमंत फाटक
5/7/2024
- Varsha Hemant Phatak
« Prev
Next
»