मी चालते आहे एका निष्पर्ण वाटेवरून, झुंजत।
एक ध्येय शोधत,
पायाखाली मात्र दगड आहेत
एक एक दगड फुटतो
तो पायाला जखम देऊनच,
सतत।
वाट आणि जखमा
सोबतच चाललेल्या आहेत,
बिलगत।
हळूच निष्पर्ण वाट मागे सोडली
परत एक ध्येय समोर ठेवत
वाटेवर आता काटे,
परत।
तिच कळ उठवणारी जखम
तेच भळभळण, तीच उदासीनता, मूकपणे अश्रु ढाळत,
अविरत।
तितक्यात एक आली आर्त हाक,
लहरत।
दगड आणि काट्यांना
मखमली बनवत,
जादूवत।