हिशोब

हिशोब

मँडम दार उघडा लवकर. देविदास सर आले आहेत. कामिनी ची बाई जोरजोरात दार वाजवत होती. कामिनी हसली. रात्रीचे 2 वाजले होते. तिच्या अपेक्षेपेक्षा देविदास खूपच लवकर आले होते.

देविदास: शहरातील एक बडी आसामी होती. खूप श्रीमंत आणि नावाजलेले व्यक्ती होते.

कामिनी ने दार उघडल तस देविदास तिच्या अंगावरच धावून आले. हरामखोर, हलकट तू माझ्या मुलाशी अशी कशी वागू शकते? मी जीव घेईन तुझा!! ते संतापाने थरथरत होते.

कामिनी शांतपणे समोर आली तसा त्यांनी तिचा गळाच आवळला. तू, कामिनी तू माझ्या मुलावर बलात्कार कसा काय करु शकते? एक स्त्री अस कस करू शकते??
सोडा मला देविदास. मी मेली तर उद्या तो video viral होईल हे लक्षात ठेवा. मी तशी सोय केलेली आहे. तिने जोरात देविदास चे हात झटकले.

आणि हो तुम्ही आत्ता काय म्हणालात? एक स्त्री पुरुषावर कशी काय बलात्कार करु शकते? तुम्ही जेव्हा माझ्यावर अत्याचार केला होता न तेव्हा तो शरीरावर केला होता. तुमच्या मते!! पण तो माझ्या मनावर झाला होता. मोठा आघात होता तो माझ्यासाठी. विश्वासघात होता. शरीराच्या जखमा कधीच भरल्या होत्या माझ्या. पण मनावर झालेली जखम काल भरली.

पण विनोद ने तुझ काय वाकड केल होत? तू त्याला इतक्या खालच्या थराची वागणूक का दिलीस?

मी तरी तुमच काय वाकड केल होत देविदास? काहीच नाही. तरी तुम्ही डाव साधलात. मी तर तुमच्या मुलाच्या अंगाला हातही नाही लावला देविदास!! फक्त गन रोखून मला हव ते शूट केल.

पण तुमच्या लक्षात नाही आली का एक गोष्ट? तुम्ही जेव्हा माझ्यावर अत्याचार करत होता तेव्हा माझ्या चेहऱ्यावर जे भाव होते तेच भाव, तीच अगतिकता विनोदच्या चेहऱ्यावरही होती?? म्हणजे आहे न?? घरी जाऊन Video एकदा परत पहा. लक्षात येईल तुमच्या!!

देविदास काय फरक पडतो हो अत्याचार करणारा पुरुष आहे कि स्त्री!! कारण मी पण तेच केल जे तुम्ही केल. फक्त मी त्याला हातही नाही लावला. पण आज तो ही माझ्यासारख्या च यातना भोगतो आहे कारण त्याची इच्छा नसतांना हे सगळ घडल न! एक स्त्री आपल्याला मनाविरुद्ध वागायला लावते आहे इथेच त्याच खच्चीकरण झाल.
बलात्कार नेहमी शरीरावरच होतो अस नाही देविदास तो मनावर पण होत असतो. किंबहुना मनावरच जास्त होतो. जो मी तुमच्या मुलावर केला आहे. मी त्याच्यावर जबरदस्ती केली हे सगळ्यांना कळल तर काय मज्जा येईल न देविदास!! कामिनी बेफामपणे बोलत होती.

आणि हो एक सांगायच राहिलच देविदास “मी विनोदला माझ्या अशा वागण्याच Valid Reason दिल आहे.”
देविदास असहायपणे कामिनी कडे बघत राहिले.

- Varsha Hemant Phatak





« Prev Next »