परवा एका माँल मधे गेलो होतो. नेहमी प्रमाणे तरुण पिढी त्यांना हव तस बसली होती. कानाडोळा करत आम्ही एका shop मधे घुसलो. नविन लग्न झालेल एक जोडप मोबाईल पहात होत, अचानक काय झालं माहित नाही त्या नवर्याने बायकोच्या गालात एक ठेवून दिली. आम्ही सगळे स्तब्ध!! दुसऱ्या च क्षणी तिने ही खाडकन त्याच्या गालावर पाचही बोट उमटवली. कोणालाच काही सूचेना. तो रागारागात निघून गेला.
ती बहुतेक मुंबई त नविन होती. रडत रडत ती पण बाहेर गेली तर तो निघून गेला होता. आम्ही दोघांनी ठरवलं 5/7 मिनिट वाट पहायची कोणी नाही आल तर मग मदतीला जायच.
अपेक्षेप्रमाणे कोणीच आल नाही. मग मात्र मी तिच्या जवळ गेले. तिला पहिले पाणी दिल आणि मग तिच्या शी बोलायला सुरुवात केली.
तिच नाव सानिका होत. नुकतेच लग्न झाले होते. मुलगी बोलघेवडी वाटली.
बघा काकू कसा चालला गेला. मला एकटीला सोडून. शोभत का हे त्याला? मनात म्हटल तुम्ही दोघांनी एकमेकांची जी शोभा केली ती तरी शोभते का तुम्हाला दोघांना? पण मला आत्ता आगीत तेल ओतायच नव्हत.
मी विचारल तिला काय झाल? तो एवढा का चिडला? (मी पण जरा घाबरत च विचारल).
मला 50,000 चा सेलफोन हवा होता आणि तो आत्ता घेऊन द्यायला तयार नव्हता.
Ohk!! अस आहे तर!
हनिमूनला कुठे गेला होता ग तुम्ही?
अँमस्टरडँमला!! ती म्हणाली.
किती खर्च आला ग?
3 लाख !!
बस् एवढाच!
नाही हो काकू 3 लाख खूप होतात.
हो का? 3 लाख खूप होतात!
पोरगी चाणाक्ष होती. तिला माझा रोख कळला. किंचितस हसली आणि म्हणाली,
पण काकू थप्पड मारायची काहीच गरज नव्हती न? नीट सांगितल असत तर काय झाल असत? मी त्याला आता घटस्फोटाची नोटीस च पाठवणार आहे.
बरोबर. एकदम correct. काहीच गरज नव्हती थप्पड मारायची. मी उत्तरले.
थप्पड सिनेमा किती वेळा पाहिला? मी विचारले.
3 वेळा! ती उत्तरली.
Good! अजून एक वेळ नीट बघ. तापसी पन्नू घर का सोडते? त्याने मारलेली थप्पड आणि तुझ्या नवर्याने मारलेली थप्पड यात जमीन अस्मान चा फरक आहे. समजून घे. प्रत्येक च थप्पड ही अपमानास्पद नसते. एखादी थप्पड भानावर आणणारी पण असते आणि तू पण त्याला दिलीस च की! अग 3 लाख खर्च झाल्यावर कोणता नवरा 50000 चा मोबाईल घेऊन देईल? आणि आपल्या नवर्याच्या आर्थिक परिस्थितीची जाणीव प्रत्येक स्त्रीला हवीच. मग असा वादाचा प्रसंग येतच नाही. बहुतेक डोळे उघडले होते आणि आता तिचे डोळे त्याला शोधत होते.
तितक्यात तिचा नवरा परत आलाच. Thank you काकू! म्हणत पळत सुटली आणि मी सुटकेचा निश्वास सोडला.
आणि कधीही हात न उचललेल्या माझ्या नवर्याच्या हातात हात घालून कार कडे निघाली.