वास्तव

वास्तव

कोरोना मूळे एकाच दिवशी कयामत से कयामत तक आणि सैराट बघण्याचा योग आला. बर्याच जणांनी सांगितले कि तरुण पिढी वर वाईट संस्कार होतील या पिक्चर मुळे. कोणाला तो South च्या सिनेमा सारखा बटबटीत वाटला. त्यामुळे माझा पण पहायचा राहिलाच होता. Thanks to Corona एक चांगला सिनेमा बघितल्या गेला.

खरच एका गावात राहाणारी बड्या घरची मुलगी एका सामान्य मुलाच्या प्रेमात पडते आणि घरी कळल्यावर वडील त्यांना योग्य वाटतो तोच निर्णय घेतात. (Timepass मधल्या वैभव मांगले ला माझा पूर्ण पांठिंबा आहे.) पण कसतरी करून दोघे पळून जातात आणि interval होतो.

मला वाटत interval नंतरचा सिनेमाच बघणेबल आणि काही तरी शिकणेबल आहे.

एवढ्या मोठ्या बंगल्यात राहणारी मुलगी एका अडगळीच्या खोलीत राहते. Washroom ला जातांना नाक दाबून जाते. पैसे घेऊन भाजी आणायला जाते पण खोलीत लावायला एक पोस्टर आणते. इथेच दोघांच्या राहणीमानात असलेला जमीन अस्मानाचा फरक दिसून येतो. या सगळ्या गोष्टी matter करतात. केव्हा तरी तिला वाटत कि मला प्रेम आणि family दोन्ही हव आहे. तिची ओढाताण दिसून येते. प्रेम जगण्यासाठी आवश्यक आहेच पण पैसा ही तेवढाच महत्त्वाचा आहे. इथे At least नवरा काहीतरी कमावणारा असा अर्थ अभिप्रेत आहे. प्रेम व्यवहारी असाव, आंधळ नसाव. ह्याची जाणीव पदोपदी होत होती सिनेमा बघतांना. अर्थात ती दोघे नंतर त्यांच विश्व निर्माण करतात. नंतर काही नाट्यमय प्रसंग पण घडतात. पण आजच्या पिढीनी जरूर एकदा तरी हा सिनेमा पहावा. वास्तवाला धरून वाटला सिनेमा.

आणि रात्री कयामत से कयामत तक पाहिला. इथे ही पळून जाण आहेच. पण घर बांधायला हीरो लगेच लाकड तोडायला जंगलात जातो आणि भूकेला असूनही जळलेली रोटी पाहून हसतो आणि जाने दो म्हणून तिला जवळ घेतो. किती दिवस??? साध जेवणात मीठ कमी झाल तर ओरडणारे नवरे आठवा.

मला वाटत कयामत से कयामत किंवा दिल चा Part 2 काढावा आणि पळून गेल्यावर एकमेकांच्या सहवासात आल्यावर एकमेकांच्या कमतरता काय आहेत हे समजल्यावर ते कस वागतात. एकमेकांशी कस Adjust करतात ते दाखवाव. हीरो हीरोईन पळून जातात म्हणून आपण ही जायच याला काय अर्थ आहे? आईच्या हातची पोळी-भाजी खाऊन आणि वडिलांनी दिलेले पैसे संपेपर्यंत प्रेम करण सोप आहे. नंतर काय??

शेवटी प्रेमात आकंठ बुडालात तरी आटे-दाल का भाव पता ही होना चाहिये.

- Varsha Hemant Phatak





« Prev Next »