वय

वय

आदू पटकन आवर. आपल्याला सिना च्या birthday ला जायचे आहे न. जातांना ब्युटीपार्लरमधे पण जायच आहे. हलकासा मेकअप करू आपण आणि मग पुढे जाऊ. तुझा dress पण काढून ठेवला आहे. मी Driver ला बोलावते.

Mama you go alone. I am not coming. आदिती म्हणाली.

हे ऐकून मेघा – आदिती ची आई चांगलीच चिडली. आजकाल हिला कुठे यायचच नसत. सतत आपल घरात बसून राहायच. मेघा म्हणाली, “अग तुझ्या च मैत्रिणीचा birthday आहे आणि तुच नाही येत आहेस”. ते ऐकून आदिती मनात म्हणाली, “माझ्या मैत्रिणीचा birthday आहे न तर let me enjoy! Why are you coming with me ?” पण ती काहीच बोलली नाही. तिला माहीत होत ती नाही गेली तरी आई जाणारच. मिरवायचा chance आई कसा सोडणार? मेघा खरच छान तयार झाली होती.

आदिती बघत होती आईकडे. Short skirt, matching purse, long earrings, matching chappals, perfume सगळ सगळ ती पहात होती. तिला माहित होत आता 2 मिनिटात आईचा DP change होणार. बडबड करत मेघा बाहेर पडली पण. आदुने रागाने दार बंद केल.

तेवढ्यात बेल वाजली. सुनील – आदिती चे बाबा घरी आले. त्याला आदिती ला घरी पाहून आश्चर्यच वाटल. अरे आदू तू गेली नाहीस सिना कडे?

आई गेली आहे न तय्यार होऊन! तिची हौस अजून कुठे संपली आहे मिरवायची? तिला वाटत ती अजून 16 वर्षाची च आहे!! आदू म्हणाली.

सूनिल एकदम चमकला आदू च बोलण ऐकून. त्याला काहीतरी खटकल. तो म्हणाला आदू काय झाल? आईशी भांडलीस का?
आदू एकदम रडायलाच लागली. सुनीलनी तिला जवळ घेतल. थोपटल. तशी आदू बोलायला लागली.

बाबा मला न आईचा नाँशिया आलाय. नको वाटत तिच्याशी बोलण. तिच्या सोबत कुठे जाण. तिचा तो over मेकअप, सगळ मँचिंग करण्याचा हट्टाहास, टीपटाँप राहाण अंगावर यायला लागल आहे. स्वःताच्या वयापेक्षा कमी वयाच आहोत हे दाखवण्याची हौस का आहे हिला? मला आजकाल आईबरोबर कुठे जाण नको वाटत. अस वाटत लोक मला हसतात. माझे friends म्हणतात your mom is very hot!! मला न हे सगळ आता नको वाटायला लागल आहे. मला नाही आवडत तिच वागण. बाकीच्या मुलींच्या आया पण छान राहातात. पण आईच मात्र वेगळच. माझ्या मैत्रिणीच्या पार्टीत हिच काय काम बाबा ? सगळीकडे स्वतःच्या दिसण्याच कौतुक करून घ्यायची सवयच लागली आहे आईला. आदिती चिडून बोलत होती. सूनील शांतपणे सगळ ऐकत होता.

त्याला परवाचा प्रसंग आठवला. मेघा केसांना कलप लाव म्हणून सारखी त्याच्या मागे लागली होती कारण दुसऱ्या दिवशी office ची पार्टी होती. सूनील पण वैतागला होता. जे आहे ते आहे. त्यात काय एव्हढे? पण शेवटी मेघाने त्याला कलप लावायलाच लावला. कपडे ती म्हणेल त्याच Style चे घालायचे. कोणत्या पार्टी ला काय घालायच हे मेघाच ठरवायची. तो पण भांडण नको म्हणून सोडून द्यायचा. पण याचा त्रास जर आदूला होणार असेल तर त्याला मेघाशी बोलावच लागणार होत.

रात्री त्यानी मेघाजवळ विषय काढलाच कि तिच्या वागण्याने आदू Disturbआहे. आज आपली मुलगी 16 वर्षाची आहे थोडा तर तिचा विचार कर. माझ अस्तित्व तर तू अमान्यच केले आहे निदान आदूचा तरी विचार कर. वयात येणारी मुलगी आहे थोड समजुतीने घे. पण मेघाच उत्तर तयार होत. तिच्या मते लोक तुमच्या हुशारीच कौतुक करतात तस तिच्या दिसण्याच करतात, राहाण्याच करतात. मी तुला आधीच सांगितले होते कि मी जशी आहे तशी मला मान्य कर. मला मूल नको होत पण तुझ्या साठी मी Adjust केलच न आणि आदूला समजव जरा नीट राहायला. आपण ज्या सोसायटीत राहतो त्याप्रमाणे राहायला सांग तिला. मला असच राहायला आवडत. आदू ने ते समजून घ्यायला हव. एवढ बोलून मेघा झोपून गेली. सूनील हतबुद्ध होऊन तिच्याकडे पहात राहिला. तो काय सांगायचा प्रयत्न करतो आहे ते मेघा ला समजतच नव्हत.

सूनीलला त्याची चूक कळली होती. ज्या झाडाच्या फांद्या वेळोवेळी फोफावत होत्या, त्या कापायचा त्याने कधी प्रयत्नच नाही केला आणि ते झाड आता त्याच्या घराच्या भिंतीना तडे देत होत. त्याच्या मुलीच्या अस्तित्वाला गाडायला पहात होत. सुनील ने एक निर्णय घेतला आणि घाटपांडे वकिलांना फोन लावला.

- Varsha Hemant Phatak





« Prev Next »