चिरंजीवांनी आल्या आल्या जाहिर केल कि भूगोलात कमी मार्क्स मिळाले आहेत. तसा माझा पारा चढला. फक्त फिजिक्स आणि मँथ्स चा अभ्यास करायचा, बाकीच्या विषयाला हात ही लावायचा नाही, हे योग्य नाही वगैरे माझी बडबड सुरू झाली. त्याने पण योग्य तो रिस्पॉन्स दिला आणि class ला चालला गेला. क्लासहून घरी आल्यावर त्याने सांगितले कि आई मँथ्स आँलिमपियाड ला त्याची स्टेट रँक 2nd आली आहे. मी खूप खुश झाले आणि तोंडातून नकळत निघालं “देवाची क्रुपा”.
का? भूगोलात मार्क्स कमी मिळाले तर माझा अभ्यास कमी पडला आणि 2nd आलो तर देवाची क्रुपा, अस नाही चालणार. एकतर क्रुपा किंवा अवक्रुपा! चिरंजीव उत्तरले. मी त्याच्याकडे बघतच राहिले. नक्की आपलच कार्ट आहेन!
लहानपणापासून काही आणल कि ते देवासमोर ठेवायचे आणि त्याच्या पाया पडायच हेच शिकत आले. देवाला नमस्कार केला कि positive energy येते आपल्यात, अस मला वाटत. तो आपल रक्षण करतो ही माझी भावना!
सगळं आवरुन पेढे आणायला बाहेर पडले तर शनी मंदिरापाशी एक लंगडा माणूस दिसला. माझ्या मनात विचार आला लंगडा असला तरी एका पायावर चालू तर शकतो आहेन. तेवढ्यात एक गाडी त्याला घ्यायला आली. देवाची क्रुपा!
मंदिरात गेले तर अंगावर कोड असलेली एक 30/35 ची बाई बसली होती, मनात कणव दाटून आली. कस होणार हिच? तेवढ्यात एका गोड मूलीनी धावत येऊन आई म्हणून तिला मिठी मारली. देवाची क्रुपा!
भाजी घेऊन घरी आले आणि TV लावला. Breaking News!!! दिल्लीत चालत्या बसमध्ये 6 जणांचा मुलीवर अत्याचार!! नंतर तिला खाली फेकून दिले!! ऐकून अंगावर सर् कन काटा आला. ती मुलगी मला विचारत होती, “देवाची क्रुपा म्हणजे काय ग????” मी निरुत्तर होते.
काही दिवसांनी बातमी आली कि तिचा म्रुत्यु झाला. देवाची क्रुपा!!!! कशी उभी राहीली असती ती? कोणी लग्न केल असत तिच्याशी? कोर्टात हजारो नको त्या प्रश्नाची उत्तरे देऊन अर्धमेली झाली असती ती. हिचीच काहीतरी चूक असेल. कशाला एवढ्या रात्री च बाहेर जायच?असे टोमणे ऐकावे लागेल. कदाचित ती जगली असती तर तिच्या घरच्यांनी केस पण फाईल केली नसती. घरची अब्रू! चव्हाट्यावर आली असती न.
आता माझा देवावर नाही पण दैवावर विश्वास बसायला लागला आहे.