अनुभूती

अनुभूती

कधी कधी असे व्हावे
जग हे उलटे व्हावे
ज्यांची आपण वाट पाहिली
त्यांना मनीचे कळावे
सागराने कधीतरी उलटे
यावे परतुनी
भेटावे त्याच्या सरितेला
तिच्याच उत्कटतेनी
फुलाने ही कधीतरी
वाट पहावी भ्रमराची
त्याची आतुरता फुलाने
आकंठ प्यावी
कधीतरी आई होऊनी
मुलीने तिला जन्म द्यावा
तिच्या प्रसववेदना मुलीलाही उमजाव्या
सुखाने ही कधीतरी
दुःखाला कवळावे
त्याच्या मनिचे दुःख
थोडेतरी समजून घ्यावे
फिरेल का हे जग हे उलटे
असे मला वाटे
तू तू -मी मी पेक्षा ओढ ही
महत्त्वाची वाटे

- Varsha Hemant Phatak





« Prev Next »