मै हूँ ना

मै हूँ ना

किती आश्वासक आणि धीर देणारे शब्द आहेत न. जी जादू ” I LOVE YOU ” मधे आहे तशीच जादू “मै हूँ ना” मधे आहे.

अर्थात या आधाराची किंमत घराबाहेर पडलं कि कळते. घरी आई -बाबा, भाऊ-बहीण असल्यामुळे काहीच चिंता नसायची.
काँलेजमधे असतांना अग वैशू सायकल पंक्चर झाली ग. काय एवढ मग चल डबलसीट जाऊ. कि निघालो आम्ही दोघी. काय मजा असायची त्यात. आता लोक lift देतात आणि आपण thanks!

अर्थात हे give and take असत. जोपर्यंत आपण एक पाऊल पुढे घेत नाही तोपर्यंत समोरचा पण घेणार नाही.
सासरी गेलो कि कोणीतरी “मै हूँ ना” लागतच आणि तो नवराच असेल तर मग संपूर्ण आयुष्य “बहारों फूल बरसाओ” अस बनून जातं. (फक्त या “मै हूँ ना” कडून कधीही कार शिकू नका. फुकटचा सल्ला.) मग बहार कधी पतझड बनते कळतं नाही.

पण कधी कधी या पहिल्या “मै हूँ ना” चा राग आला कि दूसरा “मै हूँ ना”असतो. ती म्हणजे जवळची मैत्रीण!!
ती आपल्याला पूर्णपणे ओळखून असते. काहीही बोला तिच्याजवळ. गुपित गुपितच राहाणार. अगदी नवऱ्याशी भांडण झाले तरी आपण तिला विश्वासाने सांगू शकतो. कितीही नाव ठेवा ती ऐकून घेते शांतपणे आणि आपल्याला ही माहित असत एक शब्दही ही या कानाचा त्या कानाला कळणार नाही आणि सगळं ऐकून झाल कि शांतपणे आपली चूक दाखवून देते. हा “मै हूँ ना” आयुष्यात फार महत्त्वाचा असतो.

अमेरिकेत असतांना मला मैत्रिणींची किंमत कळली. आजारपणात एक एक दिवस ठरवून त्या डबा द्यायच्या. परत काही खूप great केल्याचा आव नाही काही नाही.
इथे पण खूप जिवाभावाच्या मैत्रिणी आहेत. “मी आहे न”! कशाला काळजी करते” म्हणणाऱ्या. अजून काय हव आयुष्यात?
कधी कधी एक “सखा ” असतो जो “मै हूँ ना” च मूर्तिमंत रुप असतो. तिथे male/ female अस काही नसतं. ते अस्तित्व आपल्यासाठी महत्वाच असत.
“Never admit the pain” हे त्या अस्तित्वासमोर गळून पडत. आपण आरशासमोर असतो.
असा “मै हूँ ना” मिळायला नशीब लागत.

कधीतरी नकळत आपण ही कोणाच “मै हूँ ना ” बनून पहायला काय हरकत आहे न ?

- Varsha Hemant Phatak





« Prev Next »