नेमेचि येते आणि जाते
दरवर्षी तर तेच होते।
कोणी केक कापून
तर कोणी देवळात जाऊन।
कोणी बीचवर तर
कोणी गडावर।
कोणी नातेवाईकांसोबत
तर
कोणी मित्रांसोबत।
तेच प्लँनिंग, तीच गडबड।
रात्री बारा वाजता
एकमेकांना फोटो आणि मेसेजेस पाठवण्याची तीच धडपड।
रात्र सरेल उत्साहात
नविन वर्ष येईल आनंदात।
परत सगळे होतील मार्गस्थ
आपापल्या कामात व्यस्त।
प्रेम ,आपुलकी आणि जिव्हाळा यांचा
होईल तिथेच
अस्त!