मोबू

मोबू

शोध लागला नव्हता जेव्हा मोबाईलचा
आधार होता तेव्हा पत्राचा ।

आता मात्र हरवला तो ठेवा
जो दूर करीत असे दोन जीवांतला दुरावा ।

मोबाईलचा मेसेज असतो नश्वर
अजरामर होते आपले लेटर ।

जतन होत होते आठवणींचे
साक्ष होते ते गोड
क्षणांचे ।

आज आला मोबाईल घराघरात
गेला तो सुवर्णठेवा भूतकाळात ।

कुठे ते लिहिलेले चार पानी पत्र
आणि कुठे हा ढापलेला मेसेज चित्रविचित्र ।

मोबाईल नव्हता तेव्हा
फिरत होतो सगळीकडे
सेल्फी चे फँड नसल्याने
डोळ्यातच साठवत होतो
सह्याद्रींचे कडे ।

नव्हता मोबी त्यामुळे हात पुढे करु शकलो मदतीचे
करत नाही बसलो शुटींग
अपघाताचे ।

नाही मिळाल्या likes
तरी
मिळाले त्यांचे आशीर्वाद
कितीतरी।

- Varsha Hemant Phatak





« Prev Next »