छकुला

छकुला

आई किती ग हाका
तुला मारल्या,
का नाही ग आलीस
घ्यायला तुझ्या छकुल्याला।

मी होतो ग झोपलो मजेत
येऊन तिने घेतले मला कवेत,
झाली जिवाच तगमग
सहन होईना त्या आगीची धग।

जिवा चा केला ग आकांत
पण सगळ होत शांत नि निवांत,
पळायला नव्हती ग पायात माझ्या शक्ती
अशी कशी होती ग आमची नियती।

अस वाटत आई उगीच केली या जगात यायची घाई,
असतो पोटात तुझ्या सुरक्षित
शांतपणे करत गाई गाई।

आमच्या अनमोल जिवाचे,
लावले ग त्यांनी मोल।
हिच का ग केली किंमत आपल्या नात्याची,
तू मात्र जाणीव ठेव
आपल्यावर झालेल्या अन्यायाची आणि
आठवण काढत जा आई
कधी कधी तुझ्या
या छकुल्याची।

- Varsha Hemant Phatak





« Prev Next »