राज इकडे ये रे.
काय हो मावशी?
हे घे तुला कँडबरी हवी होती न? घे मी आणली आहे.
नको मावशी आई रागवेल न!
तिच कुठे लक्ष आहे तुझ्याकडे? घे खा पटकन. अलका म्हणाली.
राज ने पटकन खाल्ले आणि बाहेर गेला.
दुसऱ्या दिवशी परत पोटदुखी. राधा ने ठरवल आज लक्षच ठेवायच हा केव्हा खातो कँडबरी ते. आणि तिला दिसल कि अलका त्याला कँडबरी देते आहे. तिने तिथेच तिला पकडल आणि कामावरून काढण्याची धमकी दिली. तशी अलका गयावया करायला लागली.
ताई माझ्या पोराला माझ्यापासून नका हो तोडू.
तशी राधा चमकलीच. तुझा पोरगा? म्हणजे ही खरी आई आहे राजची?
राधा म्हणाली खर खर सांग तुला काय माहित आहे ते. तशी अलका बोलायला लागली ताई मी काम मागायला आलेन त्या दिवशीच तुमच्या सासूबाईंं चा फोटो पाहिला आणि मग राजच्या दोन्ही हातावरच्या खुणा पाहिल्या आणि ओळखले कि हे बाळ माझच आहे. गुजरातमध्ये तिथल गावात मी राहायचे. एका मैत्रिणीने तिच्या मुलाला दहा लाखात विकले मग आम्हाला ही हाव सुटली आणि तेव्हाच तुमच्या सासुबाई आल्या आणि सरोगसी चा प्रस्ताव ठेवला. त्यांनी सांगितले कि त्यांच्या सुनेच्या गर्भाशयात काहीतरी दोष आहे. त्या आम्हाला 15 लाख देणार होत्या. हाँस्पिटलचा पण सगळा खर्च त्याच करणार होत्या. मला एक मुलगा आणि मुलगी होती. काय हरकत आहे असा विचार केला पण ताई मी आई होती हो. मुल झाल्यावर मला नाही देववल पण सगळ्यांनी भाग पाडल मला. पण त्या जन्मखुणा मी नाही विसरू शकत हो ताई. तुम्ही लोक कुठे गेलात काहीच कळल नाही पण हे पोराला विकण्याच पाप केल आणि आमची वाताहत झाली. मुंबई ला आलो आणि पडेल ती काम करायला लागलो. तुमच्या सोसायटीत काम मिळाल आणि एक दिवस राज झोक्यावरुन पडला. त्याला उचलायला गेले तर मला त्या खुणा दिसल्या आणि मी ओळखल ताई कि तो माझ्याच अस्तित्वाचा अंश आहे. माझा मोठा मुलगा वारला ताई म्हणून मी याच्या ओढीने तुमच्या कडे काम धरल. मला नका काढून टाकू. राहूद्या इथेच. मी नाही सांगणार कोणाला.
राधा नुसतीच तिच्याकडे पहात होती. तिला तिच्या अस्तित्वाचि चिंता लागली होती.