मी विचार करत बसले स्वतःशी ।
आयुष्याचा जमाखर्च मांडत होते जराशी ।
उन्हाच्या रखरखत्या ज्वाला।
आयुष्याला जाळून गेल्या।
सावलीला धरायचा प्रयत्न केला।
तो ही विफल झाला।
जीवलगांचे घाव सोसत
थकून गेली।
काळासोबत चालता चालता मागेच
राहिली।
आता वेळ आली आहे
सावलीला कुशीत घेऊन
झोपायची।
माझ्या सोबतच तिच्याही
जाणिवांचा अंत करायची।