अग रीतू ये पटकन खायला. मीना ओरडली. तिला ही ऑफिस मधून आल्यावर भूक लागली च होती. मस्त गरमागरम पोहे केले होते आणि लेकिशी गप्पा मारत तिला ते enjoy करायचे होते.
आई मी दाबेली खाऊन आले. मला नको काही. रीता म्हणाली.
अरे अभि माझ्या पर्समधून 500 च्या नोटा घेतल्यास का रे तू? मीनाने विचारले.
ए बाई उलट काल तूच माझ्या पाकिटावर डल्ला मारला आहेस. पहिली बार माफ किया. तो गंमतीत म्हणाला.
तशी मीना चमकलीच. अरे मी कशाला घेऊ पैसे?
अग मग कोण घेणार?
दोघेही सूज्ञ होते. त्यांच्या लक्षात आल सगळं. पण विचारायच कस?
प्रेमाने आणि समजुतीने घेण आवश्यक होत.
दोन दिवस दोघ काहीच बोलले नाही आणि पाकिटात पैसे पण ठेवले नाही दोघांनी.
बाबा मला क्रेडिट कार्ड दे न तुझ आज! रीता म्हणाली.
दोघे ही समजले कि वेळ आली आहे.
का ग ?
अरे एका friend ला हवे आहेत पैसे. मग तिथल्या तिथे च काढून देईन.
अग पण मी देतो न तुला पैसे. किती हवेत सांग.
तशी रीता चिडली म्हणून मीना म्हणाली चल आपण दाबेली घेऊन येऊ आणि मग बोलू.
तशी रीता हमसून हमसून रडायला लागली. दोघांना ही काहीच समजेना काय झालं ते.
शांत झाल्यावर रीता सांगायला लागली, “आई तो दाबेलीवाला आहे न, राजू त्याच नाव, त्याला मी खूप आवडते अस तो म्हणाला आणि या व्हँलेनटाईनला मला त्याने रेडरोझ पण दिले. मग मी पण त्याच्याशी बोलायला लागले. आई तो खूप छान आहे दिसायला आणि खूप गोड बोलतो. मी फसले त्याच्या गोड बोलण्याला पण आता आले आहे भानावर.
एकदा त्याचा मित्र म्हणाला कि आम्ही त्याच्या रूमवर जाऊन बोलू शकतो. तर आई..
तर काय रीता!! मीना ओरडली.
तिला हळूहळू कल्पना यायला लागली होती.
पण अभि शांत होता. तो म्हणाला, “रीता माझा विश्वास आहे तुझ्यावर. बोल तू”.
बाबा मग आम्ही गेलो त्याच्या मित्राच्या रूमवर व्हँलेनटाईन डे सेलिब्रेट करायला. राजूने मला जवळ घेतल पण मला जाणवल कि काहीतरी चुकत आहे माझ. मी तिथून लगेच निघाली. पण आई माझी बँग तिथेच राहिली आणि माला माझी मैत्रिण ती पण तिथे गेली होती तिच्या मित्राबरोबर तर त्यांनी त्या दोघांचे घाणेरडे फोटो काढले आणि आता तो तिला ब्लँकमेल करतो. सगळे फोटो व्हायरल करण्याची धमकी देतो. आणि आई तो तिला काल म्हणाला कि तो सांगेल त्या ठिकाणी तिला रात्री जावंच लागेल. मला पण म्हणाला पैसे दिलेस तरच बँग परत देईन.
मी परवा म्हणून पैसे चोरले तुमचे.
मीना तर हादरली च ऐकून.
अग पण तू का गेलीस तिथे?
अग आई व्हँलेनटाईन डे होता न त्या दिवशी. मग सगळं चालत. असा विचार केला आई मी. पण आई आज कळल व्हँलेनटाईन च्या दिवशी I Love You म्हटल म्हणजे ते प्रेम खरचं असत अस नाही. पण या दिवशी खूप मुल-मुली तिथे जातात आणि तो याच गोष्टींचा फायदा घेतो.
आई मी चुकीचे नाही ग वागले. तुझे संस्कार कामी आलेत. पण माला मात्र फसली ग आई!!
अभि आणि मीनाच्या लक्षात सगळा प्रकार आला. थोडक्यात मित्र आहे म्हणून प्रेमात पडणाऱ्या लोकांना प्रायव्हसी द्यायची जेणेकरून ते काहीतरी वेडवाकड करतील आणि मग तो शूटिंग करून त्यांना ब्लँकमेल करणार.
अभि ने लगेच त्याच्या पोलिस मित्राला फोन लावला आणि राजूला आणि त्याच्या मित्राला पकडण्याची सोय केली.