नातं - कविता

नातं - कविता

प्रत्येकाला वाटे आपलं नातं असाव सुंदर
उगीच नको त्यात तुतू-मीमी ची भर।

असेल ज्याची चूक त्याने
ती मान्य करावी
माफी देऊन दुसऱ्याने ही
नात्यांची जाण ठेवावी।

एक पाऊल तू एक पाऊल मी कधीतरी मागे घ्यावे,
आधार देतांना मात्र दोन पाऊले पुढेच यावे।

असतील जरी भिंती
एखादा झरोका हवा
प्रेमाची झुळुक नि मायेचा गारवा
त्यातूनच यावा।

नाते कधीच ओझे नसावे
कधी कधी ते मोरपीसापरि असावे,
सुख ,ऐश्वर्य आणि आनंदाचे
सगळेच रंग त्यात दिसावे।

कधीतरी पडावा त्यात
मिठाचा खडा
वादावादी-गैरसमजाने
जावा त्यालाही तडा।

मग चिंतन करावे सर्वांनी
विचार घ्यावे एकमेकांचे जाणुनि
तड्यास त्या समजुतिने लिंपूनि
सुंदर नाते मग यावे उमलुनि।

- Varsha Hemant Phatak





« Prev Next »