आई मी घराच्या कागदपत्रात दुसर नाव राधाच घातल आहे ग.राजेश म्हणाला.
सीमाच्या डोळ्यात टचकन पाणी आल.तिने पटकन गँस बंद केला आणि आतल्या खोलीत चालली गेली.
सीमाच्या डोळ्यासमोर तिचा भुतकाळ आला.
लग्न झाल्यावर5/6 महिन्यातच नवऱ्याची लक्षणे दिसायला लागली आणि फसवणूक झाल्याचे लक्षात आले. तिचा नवरा अमित कधी कामावर जायचा कधी नाही. एक नंबरचा आळशी होता. सासऱ्यांच्या जिवावर घर चालत होत.नेमकं तेव्हाच ती प्रेग्नंट राहिली.अस वाटल आता जबाबदारीची जाणीव येईल. पण काही नाही. अमित ने नोकरी सोडली आणि आता व्यवसाय करायचं डोक्यात होत.सीमा ने खूप विरोध केला पण पालथ्या घड्यावर पाणी.
शेवटी तिनेच नोकरी करण्याचा निर्णय घेतला. अर्थात ते सोप नव्हतच.पण चांगली नोकरी मिळाली.एक / दोन वर्षात ह्रदयविकाराच निमित्त होऊन अमित वारला. मग सासु-सासरे गेले आणि खऱ्या अर्थाने ती पोरकी झाली.कधी मानसिक ताण तर कधी आर्थिक जुळवाजुळव करतांना नाकीनऊ यायचे.पण सीमाने मुलाला कसलीही झळ नाही लागू दिली.सगळं एकटीने सहन केल.
राजेश मात्र मेहनती आणि हुशार निघाला.त्याला आईच्या कष्टाची जाणीव होती. काही दिवसातच छान नोकरी आणि छोकरी पण मिळाली त्याला.सीमा खुश होती सुनेवर.पण आता हे घर लहान वाटायला लागल होत राजेशला. जुनही झाल होत.तिघांनी मिळून एक फ्लॅट बघितला होता.सीमाला वाटलं होत राजेश घरावर आपलं नाव टाकेल.पण त्याने दुसर नावं राधाच म्हणजे बायकोच टाकल होत आणि म्हणून सीमा जरा नाराज झाली होती.पण
तेवढ्यासाठी ती नक्कीच
मुलाला आणि सुनेला बोल लावणार नव्हती.
तेवढ्यात राधाने हाक मारली.आई बाहेर या आणि इथे सही करा.
आता माझी सही कशाला? ती मनात म्हणाली.
राजेश म्हणाला आई इथे सही कर.
अरे पण तू दुसर नाव राधाच घातल आहेस नं!मग तिची सही घे.
अग आई तिच नाव दुसरं आहे पहिल नाव तुझं!
सीमाचा तिच्या कानांवर विश्वासच बसत नव्हता.
सही करतांना आलेल्या अश्रुंमधे बरच काही वाहून गेलं होत.