गुरु

गुरु

प्रिया, अग बघ जरा ,ठोकलीस बाजूच्या कारला!! नितीन ओरडला.
अरे तुला कुठे कार दिसली इथे?सगळं मोकळं तर आहे.

अग माझे आई इमँजिन कर ग! तू एक लेन ठेवनं.पुण्यात चालवल्यासारखी नको चालवूस !!

लगेच नको टोमणे मारायला.

कस लाईसन्स मिळणार हिला काय माहित!!तो पण वैतागला होता.

प्रिया आता रडकुंडीला आली होती.
छे ,काहीच कस जमत नाही आपल्याला!

नितीन आणि प्रिया त्यांच्या लहान मुलीसोबत सिनसिनाटी ला job साठी आले होते. कार एकच होती. आणि रिधिमा ची school bus नसल्याने प्रियाला ड्रायव्हिंग शिकण भाग होत.

रोज आँफिसमधून आले कि ते बाजूच्या ग्राऊंडवर शिकायला जायचे. पण भांडणच जास्त व्हायची.

आज तिचा बांध फुटला होता. ती गाडीतच रडायला लागली.

रिधिमा म्हणाली बाबा तू दुष्ट आहेस. आईला रागावतोस.पण आई मला 1to10 नाही आलं कि तू पण रागावतेस नं मग!

तेव्हा तू राईट असतेस नं?

मग आता बाबा पण राईट आहे. तूला कुठे येते आहे कार चालवता?

दोघेही जण आपल्या Product कडे आश्चर्याने पहात होते.

प्रिया म्हणाली,” चल नितीन आज कार शिकल्याशिवाय घरी जायचच नाही”.

प्रियाने डोळे पुसले आणि कार सुरू केली. व्यवस्थित चालवली.10 दिवस प्रँक्टिस सुरु होती तिची आणि ती भारतात पण चालवायची कार. पण left and right side चा फरक असल्याने ती घाबरत होती इथे.

चला उद्या ड्रायव्हिंग टेस्ट द्यायला जायचं. आज तिने पँरलल पार्किंग पण सराईतपणे केल.

रिधिमा ने जोरात टाळ्या वाजवल्या.नितीन तर एकदम फिदा झाला होता या झाशीच्या राणीवर!!

घरी आल्यावर प्रियाने रिधिमा ला जवळ घेतल आणि thanku म्हणाली.
बच्चू तू माझा हरवलेला आत्मविश्वास परत मिळवून दिलास.आज्जी सारखं बोलली आज तू.परत एकदा thanku!

आणि मला ग?

तुळशी बागेतून लाटण आणल आहे मी!!

- Varsha Hemant Phatak





« Prev Next »