नागरिक

नागरिक

आहे मी जागरुक नागरिक।
अधिकार माझे जाणतो ।
येता गदा त्याच्यावर
चवताळून मी उठतो ।

दिसता कचरा घरात।
फेकतो दुसऱ्याच्या दारात।

घर स्वच्छ ठेवणे कर्तव्य मानतो।
भरलेली कचराकुंडी नजरेआड करतो।

नियम असतात पाळायचे
हे जगाला सांगतो।
पळवाटा शोधण्यात मी
धन्यता मानतो।

दिवसा पर्यावरण रक्षणाचे
मी धडे देतो।
रातोरात जुन्या
झाडांची कत्तल करतो।

इंधन वा्चवा हा नारा दुनियेला देतो।
माणशी प्रत्येकी कार
मी विकत घेतो।

गरीबांच्या बद्दल कळकळीने बोलतो।
बस चालकाला मात्र
हकनाक मरतांना पाहतो।

सहिष्णुतेवर भाषणबाजी मी करतो।
मत देतांना मात्र
धर्माची बुज मी राखतो।

देशाचा करुन विकास
कधी कधी।
मी पहिले माझा
स्वार्थ साधतो।

- Varsha Hemant Phatak





« Prev Next »