काटा
जीवनातल्या काट्यारे
नको कधीच तुझी सोबत
या दुःखी जीवाला,
खुप सोसले, सहन केले
या जीवन सागरात।
नाही लागली नौका पार
या दुर्लक्षित जिवाची
जन्मापासून,
वेदनेच्या काट्याने पार
लक्तरे केली या दिलाची
मनापासून।
काटारुपी दुःख नसतेच
नेहमी क्षणभंगुर,
कायमस्वरूपी
सल तो होऊन
बसतो नासूर।
कितीही घातल्या पायघड्या वेदनेच्या
आणि
वाजंत्र्या वाजवल्या उपेक्षांच्या,
हटवादी तो काटा कायम
जवळी राहिला ह्रदयाच्या।
- Varsha Hemant Phatak
« Prev
Next
»