सॅनफ्रान्सिस्को ला मुलाकडे गेलो तेव्हाच ठरवलं होतं की परत एकदा नायगारावारी करायचीच! सर्व बुकिंग वगैरे झाले. सॅनफ्रान्सिस्को ते न्यूयॉर्क दोन टोकच! पण नायगारा परत बघायचाच होता. बफेलो सुंदर टुमदार गाव! हॉटेलमध्ये सर्व सामान ठेवून पायीच फिरायला निघालो. वातावरणात थोडी थंडी होती पण ती हवीहवीशी होती. टुमदार घर, गोडगोजीरे पाळीव प्राणी आणि कानात इयरफोन अडकवून जागिंगला निघालेले अमेरिकन!माणसं दिसली की आपल्याला बरं वाटतं!
मला का कोणास ठाऊक अमेरिकेतील घर आवडतात. स्वच्छ, अंगणात कमीतकमी ४/५ फुलांची झाडे , एखादे फळाचे झाड आणि एवढी फळे लगडलेली असून कोणीच कसं तोडत नाहीत हा मला नेहमीच पडलेला मोठ्ठा प्रश्न!असो!
रात्री नायगारा धबधब्यावर होणारा लाईट आणि फायर शो बघितला! नेत्रदीपक असा शो होता. विविध तऱ्हेचे लाईट्स आणि नायगारा दोघे मिळून जणू काही प्रेक्षकांच्या करमणुकीसाठी हातात हात घालून सज्ज झाले होते. निसर्ग आणि तंत्रज्ञानाच्या जादूने सर्व भारावलो होतो. अमेरिकेत सगळे भव्यदिव्य!शो बघून रात्री बफेलोला हॉटेलवर परत आलो.
मला ओढ लागली होती ती त्याच्या खऱ्या रुपाची!मानवनिर्मित तंत्रज्ञानासमोर बिचारा झाकोळला होता. सतत लाईटच्या प्रकाशात न्हाऊन निघालेल्या नायगाराचे खरे रूप सकाळच्या सूर्यप्रकाशात बघायचे होते. त्याचा तो पांढरा, हिरवटसर कोसळणारा जलप्रपात बघायला मी उत्सुक होते.
दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी पावसाने हजेरी लावली. मन जरासे खट्टू झाले. पण नायगाऱ्याला पोहचेपर्यंत थोड ऊन पडलं होतं. नेहमी ऊन पडलं की वैतागणारी मी आज खरंच खूप खूश झाले. वीस वर्षांपूर्वी बघितलेला नायगारा परत बघायची उत्सुकता होती, ओढ होती आणि जस जसे समोर जायला लागलो तस तसे त्याचे ते अवाढव्य रुप समोर आलं. अप्रतिम! परत मी भान हरपून त्या नायगाराकडे बघतं होते. एक अद्भूत शांतता, असीम आनंद मिळतं होता. बरेचसे पर्यटक जोरजोरात ओरडत होते, वाव, ब्युटीफुल, आॅसम हे शब्द सतत कानावर पडतं होते! तो नजाराच तसा होता. मी मात्र हात जोडले त्या निसर्गाच्या चमत्काराला! दोन्ही राईड्स झाल्या. तूषारात न्हाऊन निघालो. तिथून खरंच पाय निघत नव्हता.
तिथे तीन धबधबे आहेत.
हॉर्सशू फॉल्स, अमेरिकन फॉल्स आणि ब्राइडल व्हील फॉल्स.
फोटो काढायला सुचतं नव्हते एवढे थेंब अंगावर येत होते. नायगाराकडे डोळे भरून पाहिले आणि तिथून निघालो. परत पाऊस सुरू झाला होता.
आणि कारमध्ये बसत नाही तर मेसेज आला की बफेलो ते न्यूयॉर्क फ्लाईट कॅन्सल झाली आहे. आता काय? कारण न्यूयॉर्क ला सगळं पुढचं तीन दिवसांचे बुकिंग झाले होते. मुलगा म्हणाला की नाहीतरी आपण कार रेन्टने घेतलीच आहे हीच घेऊन न्यूयॉर्कपर्यंत जाऊ. मनावर दडपण आलं होतं की याला एकट्याला एवढं ड्राईव्ह करावे लागणार पण त्याची तयारी दिसल्यावर मात्र हो म्हणाले आणि खरंच सांगते एक अविस्मरणीय प्रवास झाला.
अमेरिकेवर असलेला निसर्गाचा वरदहस्त पाहून चकीत झाले. विमानाने आलो असतो तर ह्या सौंदर्याला मुकलो असतो. या सौंदर्याचा आस्वाद नसता घेता आला. जो होता है अच्छे के लिए होता है।
हिरवळीने नटलेली दाट जंगलं,थोड्याफार अंतरावर असणाऱ्या वाॉटरबॉडीज आणि अप्रतिम निसर्गसौंदर्य! कुठेही नजर फिरवली तरी मनाला सुखावणारा निसर्ग साद घालत होता. मोकळे, स्वच्छ रस्ते सुखावत होते.
सलग एकमेकांच्या हातात हात घालुन, घट्ट मैत्र असल्यासारखे उभे असलेले विविध वृक्ष! मधूनच अम्सूली रंगाचे आकर्षित करणारे झाड तर कुठे गर्द केशरी रंगाचा पर्णसंभार लेवून तोऱ्यात उभे असणारे झाड खुणावत होते. हिरवाई तर किती असावी! एखादे गाव आले की गुलाब, कण्हेराच्या आणि तिथल्या स्थानिक फुलांचे होणारे दर्शन, कण्हेरांच्या झाडांच्या रांगा पाहून तर मी हरखूनच गेले आणि आश्चर्यचकित झाले कारण 'कण्हेर' ही गणपतीची आणि थोडक्यात भारताची मक्तेदारी आहे हा माझा गैरसमज होता. (मस्त गुच्छेदार हार करण्याचा आणि तो बाप्पाला अर्पण करायचा विचारही मनात आला).
दूरवर पसरलेली हिरवीगार मैदाने! तिथे हुंदडणाऱ्या गलेलठ्ठ गाई! मधूनच धुक्यात हरवणारा रस्ता आणि हळूच डोकावणारे ऊन! मी मनमुराद आनंद घेत होते. किती आणि काय पाहू असे झाले होते.
मी कधी मुलाला ए तिथे बघ ते झाड किती सुंदर आहे! त्या झाडाचा रंग वेगळाच आहे! एकदा मुलीला! एकदा नवऱ्याला! सतत काहीतरी दाखवत होते. मी भान हरपून बाहेर बघत होते.
रेस्टएरियात उतरलो. फ्रेश होऊन बाहेर आलो तर 3/4 कार्स उभ्या होत्या.
सगळे एकेकटे!
मी स्वतःशीच विचार करु लागले की हे निसर्गसौंदर्य पाहून मी हरखून गेले होते. दहावेळा मुलांना, नवऱ्याला काहीतरी सतत दाखवत होते म्हणजे मी जे निसर्गसौंदर्य एजाॅंय करत होते ते तर अप्रतिमच होत पण ते दाखवायला, अनुभवायला माझ्या सोबतीला कोणीतरी होतं. मी प्रसन्न होऊन गुणगुणत असणारे गाणे (एकमेकांना नेत्रपल्लवी करत) का होईना ऐकत होते. माझं निसर्ग वेड तिघांनाही माहीत होते. मला प्रतिसाद मिळतं होता. हे सुख होतं! मग मनात विचार आला की आत्ता या क्षणाला जर मी एकटीच ड्राईव्ह करत असते किंवा एकटीने प्रवास करत असते तर खरंच एवढं एजॉंय केलं असतं का?
उत्तर नाही असेच होते.
मुख्य मुद्दा निसर्गाच्या सान्निध्यात असणे हा नव्हताच तर मी माझ्या माणसांच्या सान्निध्यात होते हा होता!
मला आठवलं आम्ही लेण्यांद्रीला गेलो होतो तेव्हाही हॉटेलच्या समोर मोठी झेंडूची शेती होती. पिवळाधम्म झेंडू फुलला होता मधून मधून त्या माणसाने कुंदाची आणि जास्वंदांची झाडे लावली होती. कुंदाही पानागणिक बहरला होता. ते काॅम्बिनेशन इतक गोड दिसतं होतं की विचारु नका. मी तिथेही मुलीला आणि नवऱ्याला ते दाखवत होते आणि आनंद घेत होते.
आपण जे बघतो आहे, सांगतो आहे ते ऐकायला जर कोणीच नसेल तर? आनंद देण्याने वाढतो हे नक्की पण घ्यायला कोणी सोबत तर हवं!
म्हणजे हमसफर महत्त्वाचा! निसर्गसौंदर्य नंतर येतं!
खरं न?
मी सहजपणे गुणगुणायला लागले,
हमसफ़र तू है तो
जीने का सहारा है सफर
नहीं तो गर्दिशों के
दौर का मारा है सफर।
जो सफर प्यार से कट जाये वो प्यारा हैं सफर।
हमसफर नसेल तर मात्र 'सफर' होणं हे निश्चित आहे.
वर्षा हेमंत फाटक, पुणे

- Varsha Hemant Phatak