विडंबन

विडंबन

कुणी जाल का सांगाल का
सुचवाल का ह्या कोकिळा?
वेळी-अवेळी गाऊ नको सुकवू नको अपुला गळा।

तुला वाटे तू गातोस गोड फार
आँफिसपायी झालो आहे मी बेजार
उद्या आहे माझे आँडिट चार
हवी मजला आता शांतता ही फार।
कुणी जाल का सांगाल का……

आधीच कामवाली नाही ही घरा
कामाचा मी कसा उपसु पसारा
विश्रांतीसाठी जीव तडफडे तो सारा
उकाड्याने जीव झाला
सैराभरा।
कुणी जाल का सांगाल ……..

कुणी जाल का सांगाल का
सुचवाल का त्या कोकिळा
झोपू दे मला तु गाऊ नको
सुकवू नको अपुला गळा
कुणी जाल का……..

- Varsha Hemant Phatak





« Prev Next »