परवा 2/3 कुत्री माझ्या स्कुटीच्या मागे धावली. मी एक सेकंद घाबरले, तेवढ्यात मागून एक बाईकवाला आला. सगळा रस्ता त्या बाईकच्या आवाजाने दणाणून गेला आणि ती कुत्री पण घाबरून पळून गेली. मी पण हुश्श केले.
(फ्लॉवर रेमेडीचा अभ्यास करतांना समजले की या रेमेडीज दिल्या की प्राण्यांना आवाजाचा त्रास कमी होतो) एरवी या बाईकवाल्यांना शिव्यांची लाखोली घालणारी मी त्या दिवशी मनोमन त्या चे आभार मानले. एकाच घटनेकडे बघायची नवीन दृष्टी!
कदाचित ती कुत्री चावली ही नसती. पण ही रस्त्यावरची कुत्री जवळच्या लोकांना चावलेली आहेत. त्यामुळे एक भीती मनात बसली आहे.
सकाळी मी त्याच रस्त्याने गेले तेव्हा ती कुत्री शांत बसली होती मग एकदम आत्ताच का?
भूक लागली की त्यांचीही चिडचिड होत असेल का?
करोनाच्या काळात रात्री बेरात्री कुत्री विचित्र ओरडायची. झोप नाही यायची. एकदा मनात विचार आला की त्यांना ही सुनसान रस्ता बघून भीती वाटतं असेल किंवा मास्क लावलेलीच माणसे सगळीकडे दिसत होती. प्राण्यांसाठी पण तर हे सर्व विचित्रच होतं. एक दिवस मात्र कुत्र्यांचे केकाटणे अचानक बंद झाले. म्युनसिपाल्टीचे लोक येऊन घेऊन गेले होते. कोणीतरी तक्रार केली होती. खरंच त्यांच ते केकाटणं ऐकवत नव्हते. मग मनात विचार आला की भुकेमुळे तर ते ओरडत नसतील? रस्त्यावर शुकशुकाट त्यांना खायला कोण देणार? दुसऱ्या दिवशी सिक्युरिटी गार्डला डबा दिला तेव्हा त्याला जास्तीच्या दोन पोळ्या दिल्या आणि जर एखादे कुत्रे दिसले तर खायला घाल म्हणून सांगितले. बस एवढेच केले.
आणि करोना थोडा कमी झाल्यावर म्हणजे सेकंड व्हेवच्या वेळी बघितले तर एक मुलगी रोज डबाभर भात घेऊन यायची आणि भटक्या कुत्र्यांना द्यायची. सर्व फुटपाथ अन्नाने भरुन जायचा. ती कुत्री कधी खायची कधी नाही. ती मुलगी 5/6 ठिकाणी अन्न ठेवायची आणि चालली जायची. तिचा उद्देश चांगला होता पण लोकांना रस्त्यावर चालणे मुश्किल व्हायचे. निसरड व्हायचे. कारण तो भात कुजायचा, वास यायचा आणि मुख्य म्हणजे त्या रस्त्याने कोणीही पिशवी घेऊन गेले की त्या कुत्र्यांना वाटायचे की काही खायलाच आहे का आणि ते मागे धावायचे. चूक कोणाची नाही माहित!
पण एक घटना कितीतरी गोष्टींवर परिणाम करायची.
मी काही फार प्राणीमित्र वगैरे नाही पण परवा हेमांगीची फेसबुकवर पोस्ट बघितली आणि मनात कालवाकालव झाली. त्या कुत्र्याच्या जखमा बघून कसतरीच झालं.
म्हणजे या नवीन पिढीला बोल लावणारे आपण म्हणजे मी पण त्यात सामील, कधीच रस्त्यावरील कुत्र्यांना खायला घालायला गेली नाही (आई मात्र रोज एका गाईला पोळी द्यायची पण त्या मागे धार्मिक भावना जास्त होती असं मला वाटतं) आणि या मुक्या प्राण्यांसाठी डॉ वगैरे बोलावून काळजी वगैरे कधीच घेतली नाही. जास्त सेन्सेटिव कोण हा प्रश्नच आहे? आपण की आजची तरुणाई?
कोणत्या घटनेकडे कोण कसं बघतं हे खरंच त्याच्यावर होणारे संस्कार, आजूबाजूची परिस्थिती ह्यावर अवलंबून आहे. गरीबांना मदत करायला शिकलो पण प्राण्यांना नाही. म्हणजे मी तरी!
प्राण्यांना रोज भात खायला घालणारी ती मुलगी, त्यामुळे घाण होणारा रस्ता, वयस्कर लोकांना त्यामुळे होणारा त्रास कारण रस्त्यावर चालणे मुश्किल आणि ते अंगावर कधीतरी धावून येणारे मुके प्राणी! आणि सिक्युरिटी गार्डच्या भरवशावर प्राणीमात्रांना खायला देणारी मी! का नाही स्वतः जाऊन पोळी दिली त्या कुत्र्याला?
पण हेमांगीची पोस्ट पाहून समजले की भटक्या कुत्र्यांचीही काळजी घ्यायला हवी
भटक्या मुक्या प्राण्यांवरचे हे
प्रेम बघितले की नवल वाटतं आणि कुठेतरी निश्चिंत व्हायला होतं.
मी कधी मुक्या प्राण्यांचा राग वगैरे नाही केला पण कुत्री, मांजरी पाळायला माझा तीव्र विरोध आहे . (एक कावळा मात्र गेली कित्येक वर्षे माझ्या टेरेसवर येतो आणि फरसाणच खातो. मी वेगळा डबाच केला आहे त्याच्यासाठी तो आला की 5/6 वेळा ओरडतो. मी पण पहिले त्याला खायला देते. ती वेळ चुकली की दुपारी तीनच्या सुमारास येतो. )
पण रस्त्यावर जखमी, विव्हळत पडलेल्या मुक्या प्राण्यांकडे बघायची माझी दृष्टी या घटनेमुळे (पोस्टमुळे) नक्कीच बदलली आहे.
वर्षा हेमंत फाटक, पुणे

- Varsha Hemant Phatak