अहो वहिनी तुमची मुलगी फारच रोड आहे हं! त्या स्थळाला एवढी रोड मुलगी नाही चालणार! उगीचच नकार येण्यापेक्षा फोटो पाठवायलाच नको,इति शेजारच्या काकू!!
ए, मी या साडीत कशी दिसते आहे?
रंग खुलून दिसतो आहे पण असं वाटतं की एखाद्या काठीला साडी गुंडाळली आहे की काय!, इति मैत्रीण!
अग, तूला सातवा महीना सुरू आहे नं? पण पोट तर काहीच दिसत नाही आहे. किती ग रोड ही! अर्थात सासूबाईंच्या मैत्रीणी!
वरील तीनही प्रसंगातून तुम्हांला कळलचं असेल की मी कित्ती हडकुळी होती ते!
पण मग हळूहळू ड्रेसची आणि ब्लाऊजची एकेक टीप उसवायची वेळ यायला लागली. जरा अंगात भरली आहे तर बरी दिसतेय! हे सगळे म्हणायला लागले.
मग परदेशवारी झाली. गरज नसतांना जिम लावले. आपलं कुठे वजन वाढत म्हणून पिझ्झा, बर्गर आणि चीजवर ताव मारायला लागले. गरज नसतांना स्विमिंग सुरू केले आणि गरज असतांना उगीचच बंद केले. मैत्रीणीने तिचा अनुभव आधीच सांगितला होता की स्विमिंग सुरू करु नकोस ते बंद केल की अचानक वजन वाढतं. पण ऐकेल कोण? मी कसली लठ्ठ होतेय?
माझं कसंच वजन वाढतंय! मी तर काय हडकुळीच आहे. आंखों पर पडदा या अक्लपर?
भ्रम हा म्हातारपणीच होतो असे नाही तर तरुणपणी पण होऊ शकतो.
एक दिवस पाय दुखायला लागले. डॉ कडे गेलो. त्यांनी पहिल्यांदा हाईट विचारली आणि मग त्या उंचीला अनुसरून वजन किती असायला हवे ते सांगितले आणि माझे वजन किती जास्त आहे ते पण गोड हसून सांगितले आणि परत Don't worry and don't think toooo much हा सल्ला ही दिला.
Worry आणि think नक्की सोबतंच असतात की नाही?
बरं टोमणा मारते म्हणावं तर चेहर्यावर कुत्सित टाईपमध्ये मोडणारा कोणताच भाव नव्हता.
घरी आलो त्या दिवशी मी जरा सिरियसच होते. नशीब तेव्हा व्हाट्सअप आणि फेसबुक नव्हते. मग एका मैत्रिणीला दर्दभरी कहानी सांगितली तर ती खो खो हसायलाच लागली आणि म्हणाली अग, जास्त विचार नको करु जसं वाढत तसं आपोआप कमी पण होतं गं! छोड यार!! माझं नाही झालं का?
तेव्हा व्हीडीओ कॉलची सोय नव्हती.
पण खरंच सांगते तब्येतीने चांगले असावे आणि डोळ्यांवर चष्मा असावा (जो आत्ता आत्ता लागला) ही माझी दोन स्वप्न वगैरे नाही म्हणता येणार पण मनापासून इच्छा होत्या ज्या आता चाळीशीत का होईना पूर्ण झाल्या होत्या आणि मी विचार करते की आपण जर दोन मुलांची आई आहोत तर तसंच दिसू या नं. नई नवेली दुल्हन कशाला हवीय सारखी सारखी!!
आणि प्रश्न उरला तो मेल्यानंतरचा!
शेवटी मेल्यावर लोकांना कुठे मला खांद्यावर घेऊन स्मशानापर्यंत चालत चालत जायचं आहे? येतात की अॅम्ब्युलन्समधले लोक!! उचलायला!
तर असा हा माझा चवळीची शेंग ते भोपळा व्हाया काकडी, प्रवास कसा वाटला?
मला तर खूप आवडतो हा माझा प्रवास!!
वर्षा हेमंत फाटक, पुणे

- Varsha Hemant Phatak