माझ मन …

माझ मन …

मन तुझ्या-माझ्या सारखं
साधसं वाटणारं,
पण वेळ आली कि
अहंकाराचा फणा काढणारं।

माझं मन सोज्वळ
विनयाने भरलेलं,
अपमान झाला कि
डंख मारणारं।

माझं मन पापभिरू
देवभक्तिने भरलेलं,
हित दिसलं कि
स्वार्थ साधणारं।

माझं मन प्रेममय
वात्सल्याने भरलेलं,
विरोध दिसला कि
जीव घेणारं।

मना जा रे तू दूर
घेऊ दे मोकळा श्वास
संभ्रमात टाकुनि मज
नको छळुसं खासं।

तुझ्यापेक्षा तो वरचा(मेंदू)
बरा,
कार्यकारण भाव ठेवून
निर्णय घेतो खरा।

नाही गुंतत नात्यांच्या फापटपसाऱ्यात
तर्कशुद्ध पुरावे देऊन
निर्णय घेतो क्षणात।

- Varsha Hemant Phatak





« Prev Next »