अग मी श्रावण!
माझ्यावर नाही तर काय त्या भाद्रपदावर कविता करणार का?
हो तो जरा बरा!
म्हणजे मी वाईट?
तस नाही रे पण मला नाही आवडत तू!
मी नाही आवडतं? तू बरी आहेस ना?
हो रे! सारखं सारखं काय तेच ते!
म्हणजे?
तीच हिरवाई, तेच प्रेमगीत, तेच झुले, तीच हिरवीगार मखमली झाडे, त्यांचा डौलदार पर्णसंभार, तेच सण समारंभ! नटणं, मुरडणं तेच कौतुकही! काही नको वाटतं बघ!
मला मुळी तूच यायला नको वाटतं!
का ग अशी रुसलीस माझ्यावर?
नाही रे आजकाल काही नकोच वाटतं! माझा श्रावण तर तू हिरावून नेलास! सगळ रखरखीत वाटतंय!
तू आलास की सर्व आठवणी उचंबळून येतात आणि श्रावणसरी झडतात! खरंतर डोळेही कोरडेच झाले म्हणा! पण मनाचं काय रे! दाटून आलं की गुदमरायला होतं!
पण मग यात माझी काय चूक? ये बरस माझ्यासोबत!
खरंय! तूझी काहीच चूक नाही पण सगळीकडची हिरवाई बघून ओसाडलेपण जास्तच जाणवतं
नको ना बरसू असा!
अग मी सर्वांचा आहे आणि माझ्या हातात नाही गं कोणाला हिरावून नेणे, मी फक्त धरेला प्रेम देतो, फुलवतो! निष्पर्ण नाही करतं! माझा स्वभाव नाही गं तो! मी तर तूला रिझवायला आलो होतो! पण तू दुःख कुरवाळत बसली आहेस! बस बापडी! नाही येणार आता!
पण त्या इंद्रधनुष्याकडे एकदा तरी बघ!
तू जा रे इथून! नको येऊस सारखा सारखा!
अग मी आहे म्हणून तुझ्या आसवांना सहारा आहे, माझ्या थेंबात मिसळलेले अश्रु, अश्रु कुठे राहतात, श्रावणसरी होतात! तूच तर म्हणायचीस नं!
आणि तुझा तो आवडता शेर,