द इन्व्हेन्शन आॅफ लाईंग या चित्रपटाचा आधार होता खोटं बोलणे. हा उल्लेख वाचला बाळ फोंडके यांच्या पुस्तकात. *खोटं कधी बोलू नये* या रंजक आणि माहितीपूर्ण लेखात. एकूण दहा लेख आहेत या पुस्तकात.
स्कोपोलामिन आणि सोडियम पेन्टोथाल ह्याचा वापर करुन नार्को टेस्ट कशी केली जाते ते सांगितले आहे. अर्धबेशुद्धअवस्था आणि खरेपणाची जाणीव, त्याच्या मर्यादा हे वाचायला मिळतं.
खोटं बोलण्यावर झालेल्या संशोधनाची माहिती अचंबित करते आणि लाय लॅब च्या एका वेगळ्या, प्रयोगशील कार्यक्रमाचा उल्लेख पण केला आहे. कोणतं खोटं बोलणं गुन्हा ठरत आणि कोणतं नाही? समाजविघातक खोटं बोलण कोणत? खोटं बोलणं आणि ताण याचा पण छान संबंध स्पष्ट केला आहे.
पण मला भयचकित करून गेलेला लेख म्हणजे *मातृत्व ६.०* खरंतर अनुक्रमणिकेत हे नाव वाचूनच मी हे पुस्तक घेतलं होतं.
मातृत्वाची सदोष प्रणाली १.०
दोघांमध्येही दोष नसून मूल न होणे.
१.१ स्त्रीच्या मनाचा विचार न करता त्याच वंशातील कोणत्याही एका पुरुषाशी संबंध ठेवून मुल जन्माला घालणे किंवा नियोगप्रणाली! (पंडू, धृतराष्ट्र आणि विदूर) अर्थात तेव्हा समाजमान्यता होती.
नंतरची पद्धत आर्टिफिशियल इनसेमिनेशन बाय डोनर म्हणजे नकळतपणे एखाद्या स्त्रीला आई होण्यास मदत करणे. (विकी डोनर सिनेमा आठवा)
टेस्ट ट्युब बेबी २.१
गर्भांकूर गोठवून ठेवणे २.२
सरोगेट मदरहुड २.३
पाळी येत नसलेल्या मुलीच्या बीजकोषाचे गोठवलेले तुकडे तिला मातृत्व बहाल करण्यात उपयोगात आणले गेले.
मुझा मातृशी तिचं नाव ठेवलं
गेले तिचे.
आपण वाचतांना विज्ञानाच्या प्रचंड यशापुढे नतमस्तक व्हायला लागतो आणि साशंकही!
निसर्गाच्या विरुद्ध जाऊन हे सर्व योग्य आहे का?
मी आता ६.० पर्यंत काय वाचण्यात येईल याचा विचार करत होते.
३.० नाव होतं आपल्या सगळ्यांच्या ओळखीच्या डाॅली च. ५/७/१९९६ विज्ञानाचा चमत्कार! क्लोनिंग चा!
डॉली सात वर्ष जगली.
४.० चा गर्भधारणेचा प्रयोग आपल्या डोक्यावरुन जाणारा पण याचे सामाजिक परिणाम खूप दूरवर झाले. खरंतर आई आणि वडील म्हणजे या तंत्रज्ञानाप्रमाणे दोन माता आणि एक पिता असेल तर तर? कारण एकीने दुसरीला तिचा मायटोकाॅंन्डिया उदार मनाने वापरायला दिला असतो. मुलावर हक्क कोणाचा?सामाजिक /मानसिक परिणाम काय?
गर्भधारणेची /जन्माची पाचवी पायरी ५.० वाचतांना मी मात्र हादरुन गेले. मला प्रतिसृष्टी निर्माण करणाऱ्या विश्वामित्रांची आठवण झाली. जननपेशीच नसतील तर मूल जन्माला कसं घालायचं?
उत्तर होतं कृत्रिम शुक्राणु! आणि चिनी वैज्ञानिकांनी उंदराची पिलावळ जन्माला घातली.
अर्थात हे मनुष्यप्राण्यावर प्रयोग व्हायला सोपे नाही आहे पण विचार तर डोकावला आहे. अविचार म्हणू याला आपण सामान्य माणसं! प्रकृतीच्या, निसर्गाच्या रचनेशी का खेळायचं? कधीतरी वाटतं की आपण अल्पबुद्धि आहोत ते ठीक आहे. अज्ञानात सुखी आहोत. प्रत्येक स्त्रीची मातृत्वाची इच्छा पूर्ण होणे गरजेचे आहे आहे हे एक स्त्री म्हणून नक्कीच समजू शकते पण निसर्गाच्या नियमांना तोडून /मोडून, परिणामांचा विचार न करता, हे कितपत गरजेचे आहे?
लेखक म्हणतात १ ते ५ या प्रयोगात कुठेतरी मानवाचा अंश किंवा मानवी मदतीची गरज आहे. पण मातृत्व ६. ० काय असेल? का ते मातृत्व ०.० असेल? या वाक्याचा अर्थ मेंदूला झिणझिण्या आणतो हे नक्की.
पुस्तक नक्की वाचा. प्रत्येक लेख उपयुक्त आहे आणि साध्या सोप्या भाषेत समजावून सांगितला आहे.