कविता : भूत


#भूत
(विषय : शतकोटी रसिक)

भूता भुता दिसतो कसा
कापूस तरंगतो हवेत जसा
उलटे तिलटे पाय दाखवी
मनात उगा धडकी भरवी

कधी विहीरीत कधी वाड्यात
खरंच का रे तू राहशी
ये ना कधीतरी समोर असा
अस्तित्व तुझे दाखव जगासी

सांग तुझ्या वेदना कानात
का नाही मोक्ष मिळाला
अतृप्तेचे कोणते दुःख, मनात
ठेवूनि तू देह त्यागला

खरंच का तू सूड उगवतो
अविनाशी शक्ती बाळगतो
लोकांना तू खूप पछाडतो
जगणे त्यांचे मुश्किल करतो

रामरक्षा म्हणता पळून जातो
खरंच का प्रभू तूला आज्ञा देतो
माणसांपेक्षाही भाग्यवान खरा
मला तर मग तूच भासतो

कोणी म्हणती असती
सावल्यांचा हा खेळ
कोणी म्हणती जमतो
अतृप्तांचा इथे मेळ

जादूटोणा, मूठमाती
स्वार्थासाठी सर्व करती
माणसेच खरे तूला छळती
गुप्तधनाच्या मागे पळति

नको करु दुःख वेड्या
अवेळी आलेल्या मरणाचे
नाहीत कोणीच सुखी इथे
जगणेच झाले वेदनांचे

वर्षा हेमंत फाटक, पुणे
30/8/2024

- Varsha Hemant Phatak





« Prev Next »