कविता : पुतळा


#पुतळा

मी रोजच कोसळतो
परिस्थितीच्या ओझ्याने,
कोणीही आलं नाही
सावरायला

माझा पार चेंदामेंदा होतो
कार, बसच्या धडकेने
कोणीही आलं नाही
उचलायला

आज एक पुतळा पडला
सगळीकडे गहजबच झाला,
सगळे आले तावातावाने
भांडायला

महाराजांचा पुतळा पडला
आग मस्तकात गेली, त्यांच्या
आदर्शांची होणारी पायमल्ली
उरात कळ उठवून गेली

अनेकांनी स्वतःची पोळी
भाजून घेतली
पुतळा फायबरचा कि लोहाचा
ह्यावर भरपूर चर्चा झाली

पुतळ्यास गुरु मानुन
एकलव्य शिष्य झालेला
पुतळ्यास विषय बनवून
समाजात वाद पेटलेला

महाराज आहे मनामनात
प्रत्येक हिंदूंच्या हृदयात
राजे ते आमचे आहेत
किर्ती त्यांची अवघ्या जगात

जसे जपता पुतळ्याला
जपा तसेच त्या मुल्यांना
हिंदू राष्ट्राची शपथ घेऊन
देऊ छत्रपतींना मानवंदना

वर्षा हेमंत फाटक, पुणे
4/9/2024

- Varsha Hemant Phatak





« Prev Next »