कविता : एकच प्याला

कविता : एकच प्याला

गप्पांचा फड आणि
पडणाऱ्या टाळीची
बातच असते खूप खास
गप्पा मारतांना हवेच का
हातात पेयाचे ग्लास।

अडखळणारे शब्द आणि
लटपटणारे पाय
जाणारा तो तोल आणि
मद्यधुंद श्वास
गप्पा मारतांना हवेचं
का हातात पेयाचे ग्लास।

कार्पोरेटच्या जगात
दोस्तीचा होतो ऱ्हास,
निर्मळ मैत्रीला बसतो फास,
गप्पा मारतांना हवेचं का
हातात पेयाचे ग्लास।

काचेची बांगडीही पेलते
भरलेल्या ग्लासाचा भार,
क्षणाची झिंग घेते
मग अब्रुचा तिच्या घास
गप्पा मारतांना हवेच का
हातात पेयाचे ग्लास।

नका स्पर्शू त्या प्याल्याला
ठेवा मैत्री नि नात्यावर विश्वास,
एकच प्याला करेल
तुमच्या आयुष्याचा नाश ।

गप्पा मारतांना हवेच का
हातात पेयाचे ग्लास?

वर्षा हेमंत फाटक

- Varsha Hemant Phatak





« Prev Next »