राजा आणि राजकुमार


साम्राज्यशाही आणि परंपरेने
मिळालेला वारसा कुटुंब
चालवायला बरा असतो,
साम्राज्य चालवायला कणखर आणि कठोर राजाच लागतो

प्रत्येकाला वारसा हक्काने
गुण मिळालेले नसतात
आदर आणि सन्मान कर्तृत्वाने
कमवायला लागतात
महासत्तेला नमवायला खरे
जिगरबाजच लागतात
बाहेर जाऊन देशाची बदनामी
करणारे नामोहरमच होतात

370 पाऊले चालायला
कोणाकोणाला 75 वर्षे लागली
खऱ्या राजाने ती उडी
दहा वर्षातच मारली
राजाची जाज्वल्य देशभक्ती
साऱ्या जगाला कळली

प्रजातंत्राचे घटनात्मक रुप
राजाने समोर आणलं
भारतीय सैन्यावर दगडं
फेकणाऱ्यांना वठणीवर आणलं
जय श्रीराम चा नारा लावतं
धर्मांधांना नामोहरम केलं

आता तर प्रजा खरी
टेन्शन फ्री झाली आहे
शेजारच्या शत्रूची पुरती
दाणादाण उडवली आहे
'अभिनंदन' चौफेर सुरू आहे
'उरी' अभिमान दाटला आहे

डावपेच, रस्सीखेच हे सर्व
राजकारणात आलंच ते
कोणाला चुकलय?
पण
भ्रष्टाचाराच्या तोफांना
राजाने पार गारद केलय

बालहट्ट आणि स्त्रीहट्ट
कधीच पुरवायचा नसतो
राजा तो राजाच असतो
युवराज नेहमी त्याच्या एक
पायरी खालीच असतो
कुटुंब चालवायला वारसा
बरा असतो, देश चालवायला
राजा च लागतो

सौ. वर्षा हेमंत फाटक

- Varsha Hemant Phatak





« Prev Next »