अल्पवयीन
मी कार बेफामपणे चालवतो,
40/50 हजाराची दारू सहज रिचवतो,
मुलींना घेऊन पबमध्ये जातो,
मोठ्यांसारखे वागून
मी स्वतःला अल्पवयीन म्हणवतो
निर्भयावरील अत्याचारात तर
मीच पुढाकार घेतो,
अमानुषपणे खून करुन
मी रिमांड होमला जातो,
मी स्वतःला अल्पवयीन म्हणवतो
कायदा पद्धतशीरपणे मोडतो,
सतरावर्षे अकरा महिन्यात
सतराशेसाठ गुन्हे करतो,
फाशीच्या शिक्षेपासून वाचतो,
एका महिन्याने मी
अल्पवयीन ठरतो,
मी सगळे मॅनेज करतो,
पश्चातापवर छानसा निबंध लिहीतो,
सद्वर्तनाची हमी देतो,
स्वतःची सुटका करुन घेतो,
मी अल्पवयीनच ठरतो
सौ. वर्षा हेमंत फाटक
20/5/2024
- Varsha Hemant Phatak
« Prev
Next
»