माझा आवडता इंग्रजी शब्द

माझा आवडता इंग्रजी शब्द

सध्या जगात कुठेही पहा हेवेदावे, खून, युद्ध, चोऱ्या हेच दिसतंय. जग तिसऱ्या युद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहे.
जो तो एकमेकांच्या जीवावर उठला आहे.
प्रत्येकाच्या मनात अशांतता आहे कारण काहीही असो पण मनुष्य सैरभैर झाला आहे हे नक्की!
निसर्गाचा प्रकोप सगळ्या जगात दिसतो आहे. भूकंप, वणवे आणि महापूरामुळे कितीतरी प्राणहानी आणि आर्थिक नुकसान सहन करावे लागते. रोज सकाळी पेपर हातात घेतला की अपघात, घातपात या बातम्या वाचायला मिळतात. मनुष्य यंत्राच्या तालावर नाचतो आहे आणि स्वतःच यंत्रवत झाला आहे आणि शांती गमावून बसला आहे. अस्वस्थ आहे. साधा व्हॉट्स अपचा ग्रुप घ्या, तिथेही अतृप्त आत्मे असतात कारण त्यांना तिथेही शांतता नको असते. जे आभासी जग आहे त्या जगात पण आता अशांतता नांदते आहे. म्हणजे हिचे हातपाय कुठवर पसरलेले आहेत हे जाणवते.
ही अस्वस्थता फट म्हणता कुठे निघेल आणि आग लावेल सांगता येत नाही. सांगायचे तात्पर्य हे च की सगळीकडे पसरलेली अशांतता आणि अस्वस्थता बघितली की मला एकच इंग्रजी शब्द आठवतो *PEACE*
खूप गरज आहे! खरंतर प्रत्येकालाच शांत, समाधानी आयुष्य जगायला आवडतं पण मूठभर नतद्रष्टांमुळे ती मिळत नाही. पण प्रत्येकाने आपल्या आजूबाजूच्या परिघात शांततेच वातावरण निर्माण करण्याचा मनापासून प्रयत्न केला तर हा परिघ मोठा होत जाईल, याची त्रिज्या मोजता न येण्याएवढी वाढत जाईल आणि शेवटी अवघ्या पृथ्वीला ती व्यापून टाकेल.
आणि मग We want Peace च्या ऐवजी We Have PEACE असे होईल.

पृथ्वी वर स्वर्ग अवतरेल!

म्हणून PEACE हा माझा आवडता इंग्रजी शब्द आहे.

वर्षा हेमंत फाटक, पुणे

- Varsha Hemant Phatak





« Prev Next »