हुकूमाचा एक्का

हुकूमाचा एक्का

राहून राहून मनात येई कधी होणार मी हुकूमाचा एक्का ।
आणि हक्क गाजवून
चालवेन माझाच हेका।

आई म्हणाली, कुठला
आपल्या बायकांच्या नशिबात एक्का-बिक्का
आपला तर नेहमी खोटाच सिक्का।

बाबा म्हणाले हसुन
खरा का हा तुझा तुक्का,
असली एक्का तर
तू ,तुझ्यामुळे
घराचा पाया आहे पक्का।

जोकर तर मी या घरचा
दुःख न दाखवता
चेहरा हसरा ठेवणारा
जिथे कमी ती जागा
भरणारा।

आई म्हणाली रुसून,
नको जोकर नको राजा
समान आपला दर्जा
खरे आपण राणी- राजा
घेऊ आयुष्याची मजा।

- Varsha Hemant Phatak





« Prev Next »