घर

घर

सुंदर कौलारू घर
सुखाची साद घालते
आनंद आणि प्रेमाला
तिथे भरती येते।

निसर्गाच्या सानिध्यात
आकाशाच्या कुशीत
प्रेमाचे क्षण अलगद
येतातओंजळीत।

पायवाटेला मग
पंख फुटतात
स्वप्नांचे इमले
गगनाला भिडतात।

नात्यांच्या बहरात
घराच्या भिंतीही
मग
गहिवरतात।

- Varsha Hemant Phatak





« Prev Next »