करकचून ब्रेक दाबत असीमने कार थांबवली. एक काळी मांजर मरता मरता वाचली होती.अक्षरशः त्याला घाम फुटला होता, एकतर तो रस्ता चूकला आहे, हे त्याला समजल होत.रस्त्यावर विचारायला काळ कुत्र नव्हते आणि ही काळी मांजर मात्र आडवी आली होती. तितक्यात एक काळे कपडे घातलेली बाई धावत आली आणि त्या मांजरीला गोंजारायला लागली. असीम कारमधून खाली उतरला, त्याला खुप भूक लागली होती.त्याने त्या बाईला विचारलं काही खायला मिळेल का? तसे तिने एका घराकडे बोट दाखवले. असीम तिकडे जायला वळला.त्याने जोरजोरात कडी वाजवली तरी कोणी दार उघडेना,मागे वळून पाहिले तर ती बाईही गायब.
असीमने खिशातून एक किल्ली काढली आणि दरवाजा उघडून तो आत गेला.
ओट्यावर बरच सामान होत.त्याने मस्त पैकी आल घालून चहा केला आणि शांतपणे बसून प्यायला. तितक्यात दरवाजा उघडण्याचा आवाज आला. मगाचीच काळीसाडी घातलेली बाई आत आली. तिने जोरात दार आपटले आणि आत आली. गँसवर चहाचे पातेले पाहून ती थबकली. सावज आल आहे तर!! लपून बसला आहे बहुतेक.तिने दाखवलच नाही कि तिला कळल आहे. तिनेही मस्त आल्याचा चहा केला आणि खुर्चीत जाऊन बसली.
बराच वेळ झाला,पडवीत लपला आहे बहुतेक, तिने हळूच पिस्तूल काढून हातात धरले आणि बाहेर आली. गडद अंधारात तिला फक्त मांजरीचे डोळे चमकतांना दिसले म्हणजे इथेच आहे तर! तितक्यात मागे तिला काहीतरी हालचाल जाणवली आणि ती गरकन् मागे फिरली तर एक काळी सावली तिला घाईघाईने अंगणातून बाहेर पळतांना दिसली.ती जीव तोडून धावली पण जो होता तो पळून गेला होता.म्हणजे मी इथे आल्याच कन्फर्म करायच होत तर!!
"सर ती तिथेच आहे. मी पाहिले तिला".
असीम म्हणाला.
"कस शक्य आहे?मी स्वतःच्या हाताने मारले आहे तिला. आपली सगळी सिक्रेट्स तिला समजली होती आणि ती आपल्याला ब्लँकमेल करत होती".
कँप्टन म्हणाला.
"सर तिच भूत तर नसेल मग?" असीमने विचारलं.
तसा कँप्टन जोरजोरात हसला.
"अरे एकदा का या कँप्टन च्या हातून मौत आली कि माणूस डायरेक्ट स्वर्गात, मधली फेज नाही".
"सर, पण ती तिच होती, आपण जर तिला चार दिवसांपूर्वी मारल तर ती जिवंत कशी काय?"
असीमने विचारले.
तितक्यात कडी वाजली जोरजोरात, दोघांनीही पिस्तूल हातात धरले.असीमने हळूच दरवाजा उघडला तर एक लिफाफा दाराला लटकत होता. असीमने लिफाफा उघडताच दोन फोटो खाली पडले.ते फोटो पाहून असीम हादरला. तेवढ्यात कँप्टन ने पण ते फोटो पाहिले आणि त्याने सरळ पिस्तूल असीमच्या कनपटीला लावली.
"सर,तुम्ही दगाबाज असाल अस नव्हत वाटलं. म्हणजे रिया बेकसूर होती तर.कागदपत्र तुम्ही शत्रुला दिली होती आणि आळ रियावर आला आणि खर कळल्यावर तुम्ही तिचा खून केला".एवढ बोलून असीम थांबला.
"हो तिला सगळ कळल होत.मला पन्नास करोड मिळणार आहेत. आता फक्त आपल्या मिशन मिसाईल बद्दलची अजून थोडी माहिती मला तुझ्याकडून हवी आहे असीम.मग माझं काम फत्ते आणि तू पण मरायला मोकळा!' .कँप्टन म्हणाला.
तितक्यात त्याच्या पाठीला थंडगार स्पर्श झाला. तो शहारला,बंदूकीची नळी होती ती.
"मागे अजिबात वळू नकोस कँप्टन, जिला तू अंधारात मी समजून मारल ती तमन्ना होती,तूझी साथीदार, फक्त ओरडली मी होती ,जेणेकरून तू गाफील राहावास.असीम आणि मी तूला केव्हाच ओळखल होत.तू आमच्या पाळतीवर होता म्हणून सकाळी नाटक केल आम्ही दोघांनी".
एवढे बोलून रिया थांबली.
असीमने घाईघाईने सगळी कागदपत्रे त्याच्या ताब्यात घेतली आणि रियाला ओके म्हणून खूण केली तशी रियाने एक गोळी झाडली, असीम धाडकन खाली कोसळला. मरतांना पण त्याच्या नजरेत आश्चर्य होत.
तेवढ्यात इंडियन आर्मीचे लोक आले आणि असीमचे प्रेत घेऊन गेले.कँप्टन ने रियाला शाबासकी दिली. कारण असीम एक खतरनाक आतंकवादी होता आणि इंडियन आर्मीचा त्याच्यावर हेरगिरीचा संशय होता.रियाने अतिशय बेमालूमपणे असीमच खर रुप समोर आणले होते.असीम कँप्टन ला भासवत होता कि रिया फितूर आहे आणि रियाला भासवत होता कि कँप्टन फितूर आहे.
पण..... इंडियन आर्मीने शत्रुची कितीदा तरी वाट लावली होती.कँप्टन आणि रिया हे तर अतिशय हूषार होते.
घर नंबर 13 हे इंडियन आर्मीचे काश्मीरमधले हेडक्वार्टर होते.जिथून आतंकवादी कारवायांवर लक्ष ठेवले जात असे.आजवर अनेक आतंकवाद्यांना घर नंबर 13 मधे कंठस्नान घालण्यात आले होते.