फुलले रे क्षण - कविता

फुलले रे क्षण - कविता

आज लागली भलतीच हुरहूर
शब्द माझे गेले दुरदूर।

मी पण म्हणाले जा उडत
नाही येणार तुमच्या मागे रडत।

गेले मग मी स्वयंपाकघरात
लागले यमक जुळवाया मनातल्या मनात।

चहाशी करू पाहिली दोस्ती
पण दुधाने दाखवली दुश्मनी शिस्तीत।

डाळ-तांदूळाला बसवलं कुकरात
4 शिट्ट्या करून काढली त्यांची वरात।

टोमॅटो नव्हता म्हणून कोशिंबीर रूसली
बीट घालून तिची समजूत काढली।

आमटीच्या आल अंगात
डाळ न शिजल्यामुळे नाही पडले तिच्या फंदात।

कणकेनी केली पाण्याशी सलगी
लाटता लाटता माझी कंबरच मोडली।

अरे हे काय !!जुळले कि यमक,
कळलं मला कवितेतल गमक।

वाट पहात होती ज्या सुंदर क्षणाची
फुलला तो माझ्या मनी
या रुपानी।

- Varsha Hemant Phatak





« Prev Next »