दूध आणि बरच काही.........

दूध आणि बरच काही.........

धारोष्ण दूध,हळदीचे दूध आणि पाणीदार दूध ही तीन विशेषण मला दूधाबद्दल माहीत होती.
पण जसा अमेरिकेत पाय ठेवला आणि फ्रिजमध्ये दूधाचा मोठ्ठा कँन बघितला आणि तारीख पुढचे पंधरा दिवस चालेल अशी होती !!
काहीकाय ?म्हणजे ताज्या दूधाचा चहा नाही?तिथेच अमेरिका मनातून उतरली.
कारण ताज दूध नाही, आधीच साय काढलेले दूध म्हणजे लोणी नाही, ताक नाही आणि मुख्य म्हणजे घरचे लोणकढी तूप नाही, देवा कस होणार रे रोजच जेवण!!
पण सगळी सोय होती.बटर मिळाल,तूप केल पण ती सर नव्हती.

पण या दूध आणि बरच काहीमध्ये...... पनीर आणि रसगुल्ले पण येतात नं! गरज ही शोधाची जननी आहे.
मग दूध आटवून ते फाडल आणि मग पनीर केल आणि मग रसगुल्ले केले.तो दिवस माझा होता.तेव्हा WA आणि FB नव्हते, नाहीतर तैमूरपेक्षा जास्त लाईक्स माझ्याच रसगुल्ल्याला मिळाले असते.दूधापासून बनणारी खीर आणि बासुंदी हा माझा खूप आवडता प्रकार आहे.


आपल्या इथे बऱ्याच भागात अजूनही लोक शेळीचे दूधपण पितात.

एकदा माझ्या मैत्रिणीला डॉक्टरांनी विचारले कि तुम्ही कोणत दूध पिता?

चितळ्यांच!

एका क्षणानंतर ती आणि डॉक्टर दोघेही हसायला लागले.

म्हणजे चितळ्यांच पण गाईचे दूध!!

खरच दूधामुळे हाड मजबूत होतात.पण उत्तम असेल तरच!नाही तर पाणी काय आणि दूध काय सारखेच. आपण बघतो पहेलवान लोक 2/3लिटर दूध एकावेळी पितात.
पण खरचं आजच दूध तेवढे पौष्टिक आहे का?
किंवा दूध हा संपूर्ण आहार होऊ शकतो का?
कोणी कोणी लोक नुसतेच दूध पिऊन जगतात.त्यांना दूधाहारी बुवा म्हणायचे.

पूर्वी ऋषी- मुनी दूध आणि कंदमुळे खाऊन राहायचे. तेव्हा गाई दान केल्या जायच्या.ज्या राजाजवळ भरपूर प्रमाणात गाई असायच्या तो धनवान समजला जायचा.गोकुळातले दूध-दुभते जेव्हा मथुरेला जात होते तेव्हा क्रुष्णाने आडकाठी केली होती.कारण त्या दूध-दुभत्यांवर गोकुळातल्या मुलांचा अधिकार होता.
कामधेनू साठी झालेले दोन ब्रम्हर्षीचे युद्ध आठवा.
अश्वत्थामाची गोष्ट कोण विसरणार?पाण्यात पीठ कालवून दूध म्हणून पिण्यासारखी गरीबी तेव्हा ही होती तर.त्या काळी गोधन हे प्रतिष्ठेच आणि ऐश्वर्याचे लक्षण होतं.

दूधाशी निगडित दोन बाबी म्हणजे चहा आणि काँफी.कोणाला फक्त दूधाचा चहा लागतो तर कोणाला फक्त दूधाचीच काँफी लागते. आता तर हळदीचे दूध पण 300/350 रुपयाला मिळतं.फक्त ते घरी नाही तर बाहेर सगळ्यांना दाखवत दाखवत,सेल्फी
घेत प्यायच असतं.

मातेच्या दूधाचे नवजात शिशुसाठी असलेले महत्व सर्वमान्य आहे. आता तर स्तनदा माता
हा अमूल्य विचार समाजात रुळतो आहे हे अतिशय चांगले आहे.


दूधाचा अभिषेक श्रावण महिन्यात महादेवाच्या पिंडीवर करतात तेव्हा हे चूक कि बरोबर हा विचार मनात आल्याशिवाय राहात नाही.

दूधाच्या बाबतीतली एकच गोष्ट मला आवडत नाही ती म्हणजे दूध उतु जाणे,देवा! तो ओटा धूण,ती शेगडी धूण,कठीण होत आणि परत आपण कसे वेंधळे हे सगळ्यांच्या नजरेत दिसण अजूनच असह्य!
पण मी म्हणते एखादा चांगला विषय दिसला आणि आपण लिहीत बसलो नि गेले थोडे दूध उतू तर काय हरकत आहे😊

- Varsha Hemant Phatak





« Prev Next »