माझा syllabus मी पूर्ण केला आता मला परिक्षा नको, रिझल्ट नको काही नको. थकली मी आता. आता मी परत लहान होऊन जगणार आहे. बागडणार आहे. रेवती हे सगळे शब्द जुळवत होती मनाशीच!
रेवती लहानपणापासूनच बुद्धिमान मुलगी होती. तिला डाँक्टर व्हायच होत,ते नाही जमल पण डॉक्टर ची बायको होऊन डॉक्टरिणबाई मात्र ती झाली होती.
यथावकाश दोन मुल झाली. मुले पण भरपूर शिकली. आपापल्या पायावर उभी होती.
आणि आज तिला अचानक वाटलं कि मी तर माझ आयुष्य जगलेच नाही. जे केल ते इतरांना आनंदी ठेवण्यासाठी.तडजोडीत पण पडती बाजू माझीच होती.आपण फक्त नवऱ्याची सावली होतो बाकी अस्तित्व शून्यच!
एक एक परिक्षा देत राहिलो.सिल्याबस मात्र समोरची व्यक्ती ठरवत होती. मुलगी, बायको, सून,वहिनी,आई सगळ्या परिक्षेत ती उत्तम रितीने पास झाली होती.
आणि आज वयाची साठी गाठल्यावर आपल्याला हे जाणवत आहे. का?आत्ताच का?सगळी सुख पायाशी असतांना कळ का उठली? तिला काही कळेनासे झाले होते.आनंदी च्या बोलण्याचा तर परिणाम नसेल न हा?
आनंदी तिची होणारी सुन.परवाच यश ने तिला घरी आणल होत.
सगळ्यांसमोर तिच आत्मविश्वासाने वागण.सासऱ्यांना सांगण कि मी तुमच्या हाँस्पिटलला join होणार नाही.ती जिथे प्रँक्टिस करते आहे तिथेच सुरू ठेवणार आहे.संयत शब्दात तिने तिच मत मांडल होत.
हे आपल्याला का नाही जमलं? आधी बाबा ,मग नवरा आणि आता ही सून!!! आपण दबूनच राहायच! माझ अस्तित्व काय राहिलं मग?बाहेरून आलेली ही मुलगी परत माझ्या सासुपणाची परीक्षा घेणार!परत एक नविन सिल्याबस! नकोच आता काही. दूर कुठेतरी निघून जाव,अस रेवतीला वाटायला लागल होत.
तितक्यात यश आणि आनंदी आत आले.
“आई,चल लवकर ,तयार हो.आपण आज शाँपिंगला जाऊया आणि बाहेरच जेवू !” यश म्हणाला.
“अरे, सगळा स्वयंपाक तयार आहे. वाया जाईल न आता”. रेवती म्हणाली.
जाऊ दे ग आई. बघू नंतर.यश म्हणाला.
“यश अन्नच नाही तर आईंची मेहनत पण आपण वाया घालवतो आहे.”आनंदी म्हणाली.
रेवती एकदम चमकलीच.
“आई, आपण घरी जेवू आणि मग जाऊ बाहेर.चालेल नं?पण पैठणी घ्यायच्या वेळेस तुम्ही मला सोबत हव्या आहात.तुमच्याशिवाय मी पैठणी घेणार नाही”.आनंदी म्हणाली.