तूला अस अवकाळी
येतांना पाहून,
मनात साचायला लागतात निराशेचे ढग
आणि
दाटून आलेले कढ
उसासे घेतात, क्षणार्धात
सरी कोसळायला लागतात
नंतर मात्र मन रिकामं होत
निचरा व्हायलाच हवा नं रे
पण कधीतरी तुंबतच ते,
वाहून जाण्यासारखं असं काहीच नसतं
मग खोलवर मुरत जातं
आतपर्यंत
आणि उद्रेक होतो,
खरं सांगू तो
पूर पण नं जीवघेणा असतो, सगळं संपवून शांत,
निवांत होतो
पावसाशी काही संबंधच नसल्यासारखा!!
प्राणहीन!!